
Astrology : तुमच्या हातावर आहे का 'अशा' रेषा? लग्नानंतर पडेल पैशांचा पाऊस
सूनेला घराची लक्ष्मी म्हटले जाते आणि ज्या घरात सूनेचा आदर केला जातो त्या घरात कायम सुख-सामाधान नांदते. बऱ्याच लोकांचे लग्नानंतर भाग्य बदलते हे आपण अनेकवेळा बघतो. हस्तरेषा ज्योतिषानुसार बऱ्याचदा असे दिसून येते की, जोडीदारामुळे आयुष्यात सुखद बदल घडतात. जाणून घ्या कोणत्या रेषेने तुमच्या लग्नानंतर काय बदल घडतील.
चंद्र उंचवटा रेषा
हस्तशास्त्रात सांगितले आहे की, चंद्र पर्वतापासून निघणारी रेषा लग्नाबाबत फार लाभदायी मानली जाते. भाग्य रेषा चंद्र पर्वतापासून ते शनि उंचवटापर्यंत गेली तर हितकारी मानली जाते. लग्नानंतर अशा लोकांचे भाग्य लवकर बदलते. नोकरी-व्यवसायात धनलाभ होतो. अशा लोकांचे दांपत्य जीवन सुखमय होते.
बुध उंचवट्याखालची रेषा
हस्तरेषा शास्त्रानुसार करंगळी खाली बुध उंचवटा असतो. या बुध पर्वतावरच्या रेषांवरूनही लग्नानंतरच्या आर्थिकस्थितीचा अंदाज लावता येतो. बुध उंचवट्यावरच्या रेषा जेवढ्या स्पष्ट तेवढे सुख अधिक मिळते. करिअरमध्ये प्रगती आणि संतती सुख पण मिळते. जर कोणाच्या हातावर भाग्य रेषा मणिबंधपासून निघून शनी उंचवट्यापर्यंत जात असेल तर फार लाभदायक असते. लग्नानंतर अशा लोकांना धनलाभ होतो. हातावर भाग्य रेषा जेवढी स्पष्ट आणि कट न झालेली असेल तेवढे अधिक सुख मिळते.
यशामागे जोडीदाराचा हात
जर कोणाच्या हातावर कोणची रेष अंगठ्यापासून गुरू उंचवट्यापर्यंत जात असेल तर अशा लोकांचे लग्नानंतर भाग्य बदलते. त्यांना कायम जोडीदारची साथ मिळते. लग्नानंतर त्यांच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती होते.