Parivartini Ekadashi 2026: Date, Vamana Avatar Puja, and Zodiac Impact
esakal
Parivartini Ekadashi 2026: हिंदू धर्मशास्त्रात चातुर्मासातील भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या एकादशीला 'परिवर्तिनी एकादशी', 'पद्मा एकादशी' किंवा 'वामन एकादशी' म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात योगनिद्रेत असलेले भगवान विष्णू या दिवशी आपली कूस बदलतात. यंदा २२ सप्टेंबर २०२६ ला हा पावन योग जुळून येत आहे.
पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण करण्यासाठी वामन रूप धारण केले होते. त्यामुळे या दिवशी श्रीहरीच्या वामन अवताराची विधिवत पूजा केल्याने अजाणतेपणी घडलेल्या पापांचा नाश होतो आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते. भगवंताचे कूस बदलणे हे सृष्टीतील आणि भाग्यातील मोठ्या बदलांचे संकेत मानले जाते. या शुभ पर्वाचा सर्व १२ राशींच्या जातकांवर कसा प्रभाव पडेल, ते सविस्तर पाहूया-