Diwali 2022 : या दिशेपासून सुरु करा दिवाळीची साफ-सफाई; लक्ष्मी-कुबेराचा लाभेल आशिर्वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Cleaning astro tips 2022

Diwali 2022 : या दिशेपासून सुरु करा दिवाळीची साफ-सफाई; लक्ष्मी-कुबेराचा लाभेल आशिर्वाद

Diwali Cleaning 2022 : नवरात्रोत्सवानंतर आता घरोघरी दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. वर्षांतील सर्वांचा आवडता, उत्साह अन् जल्लोषाने परिपुर्ण असा दिवाळी सण आता जवळ आला असून घरोघरी दिवळीच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी म्हटलं म्हणजे घरी लक्ष्मीचे आगमन होणार. असं म्हटल जात 'स्वच्छता जेथे जेथे लक्ष्मी सदैव नांदे तेथे'. या ओळीनुसार दिवाळीचा सण जवळ येवू लागताच सर्वत्र साफ- सफाई केली जाते. आणि दिवाळीत साफ- सफाईचे हेच एकमेव कारण असल्याचे आपल्या घरातील आज्जी आजोबा सांगतात, हो ना...! मात्र तुम्हाला माहिती आहे का? घरात दिवाळीची साफ- सफाई करताना कुठून सुरुवात करायला हवी ते...? चला तर मग जाणून घेवूया.

(Perfect direction to start Diwali cleaning 2022 by vastu shastra Blessings of Lakshmi-Kubera)

हेही वाचा: Astrology : स्त्रियांच्या कुंडलीत हे योग असतील तर होतील जुळी मुलं; जाणून घ्या

कोपऱ्यांपासून करावी सुरुवात

दिवाळीची साफ- सफाई सुरु केल्यानंतर सर्वप्रथम घरातील कोपऱ्यांपासून सुरुवात करायला हवी. यातही ईशान्य कोपऱ्यापासून सुरुवात करणे अधिक महत्वपुर्ण मानले जाते. कारण वास्तूशास्त्रानुसार घरातील ही दिशा देवतांची दिशा मानली जाते. यासह ही कुबेराची देखील दिशा मानली जाते. त्यामुळे घरात दिवाळीची साफसफाई करताना ईशान्य कोपऱ्यापासून करावी. यासह यादिशेला कुठलीही अडगळ ठेवू नये, यामुळे घरात सुख- समृद्धी नांदते असे म्हटले जाते.

हेही वाचा: Astrology Horoscope : पाळीव प्राण्यांचा कुंडलीतील ग्रहांवर होतो मोठा परिणाम; हा प्राणी विशेष महत्वाचा

ईशान्येनंतर लगेच या दिशेला करावी स्वच्छता

दिवाळीची साफसफाईची सुरुवात जरी आपण ईशान्य दिशेच्या कोपऱ्यापासून केली असली तरी पुर्व दिशाही तितकीच महत्वाची आहे. कारण पुर्वदिशा ही सुर्योदयाची दिशा आहे. त्यामुळे या दिशेने घरात सदैव सकारात्मक उर्जा येत असते. सुरुवात ईशान्य कोपऱ्यापासून केल्यानंतर लगेच घरातील पुर्व दिशेला स्वच्छता करावी आणि त्यानंतर घरातील इतर भागात साफ-सफाई करावी.

Diwali Cleaning Astro Tips 2022

Diwali Cleaning Astro Tips 2022

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला ‘हे’ उपाय करा; नशीब होईल धन-धना-धन

घरातील अत्यंत महत्वपुर्ण आहे हा भाग

वास्तु शास्त्रानुसार घरातील मध्य भागाला ब्रम्हस्थान म्हटले जाते. हा भाग घरातील महत्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे या भागात कधीही अडगळ ठेवू नये. यासह वजनदार वस्तू जसे कि फर्निचर, कपाट अशा वस्तूही ब्रम्हस्थानावर ठेवू नये. यामुळे घरात वादविवाद होण्याच्या संभावना असतात असे वास्तू विशारद विजय जोशी सांगतात.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' गोष्टी करा; घरात आपोआप लक्ष्मी नांदेल