
Pillow Vastu Tips: तुम्ही उशीखाली या वस्तू ठेवून झोपतात? आजच थांबवा नाहीतर व्हाल कंगाल
Sleeping Habits Keeping Things Under Pillow : थकवा जाऊन शरीर निरोगी राहण्यासाठी रोज ७-८ तासांची झोप तरी आवश्यक असते. झोप चांगली झाली तरच दुसरा दिवस चांगला जातो. काही लोकांना झोपताना वाचण्याची, फोन बघण्याची सवय असते. तर काही लोक सकाळी फार शोधाशोध करायला लागू नये म्हणून चष्मा, घड्याळ, चाव्या उशीखाली घेऊन झोपतात.
सोयीच्यादृष्टीने हे काम चांगलं असलं तरी वास्तूशास्त्रात हे अयोग्य असल्याचं सांगितलं आहे. असं केल्याने घरात बरकत राहत नाही. देवी लक्ष्मीची कृपा राहत नाही. अशा कोणत्या वस्तू आहेत जाणून घेऊया..
पर्स - वास्तूशास्त्रानुसार उशीखाली पर्स ठेवू नये. असं म्हणतात पर्समध्ये पैशांच्या रुपात देवी लक्ष्मी वास करते. असं केल्याने देवी रुष्ट होते.
घड्याळ - बरेच लोक झोपताना घड्याळ काढून उशीखाली ठेवतात. वास्तूशास्त्रात असं करणं फार चूक समजलं जातं. इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही उशीखाली घेऊन झोपू नये. यामुळे आरोग्याबरोबर वास्तूवरही नकारात्मक परिणाम होतो.
पुस्तक - पुस्तक वाचता वाचता झोपणाऱे लोक उशीखाली पुस्तक ठेवून झोपतात. वास्तूशास्त्रात असं मानतात की, असं केल्याने त्या व्यक्तीच्या आजूबाजूला नकारात्मकता जास्त पसरते. ज्यामुळे विद्या आणि बुद्धीचा नाश होतो. यामुळे बुध ग्रह नाराज होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.