Pitru Paksh 2022 : पितृपक्षात तिथीला श्राद्ध राहीलयं? जाणून घ्या यासाठीचा विशेष दिवस

Pitru Paksha 2022
Pitru Paksha 2022Esakal

आपल्या पुर्वजांच्या मोक्ष प्राप्तीसाठी श्राद्धादी कर्म केले जातात. या कर्मांसाठी भाद्रपदातील कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष महत्वपुर्ण असतो. पुर्वजांच्या मृत्यूच्या तिथी प्रमाणे या काळात त्याच तिथीला श्राद्ध कर्म केले जातात. मात्र या काळात अनेकदा काही अडचणींमुळे ठराविक तिथीला श्राद्ध कर्म करणे शक्य होत नाही. काही वेळा तिथीचे विस्मरण झाल्याने श्राद्ध कर्म राहुन जाते. त्यामुळे पितरांसाठी श्राद्धकर्म न केल्याची खद खद आपल्या मनात राहते. मात्र पितरांचे श्रद्धापुर्वक श्राद्ध कर्म आपल्या हातुन घडावे यासाठी शास्त्रात एक विशेष दिवस सांगितला आहे. त्यासाठी हा लेख पुर्ण वाचा. (Pitru Paksh 2022 Sarvapitri Amavasya Shraddha importance)

Pitru Paksha 2022
Pitru Paksha : चतुर्दशीला या लोकांचे करू नका श्राध्द, नाहीतर ...

...या दिवशी करावे श्राद्ध

पितृपंधरवडा म्हणजेच पितृपक्षाच्या काळात आपल्या पुर्वांच्या पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी व पितरांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी वंशजांकडून श्राद्धादी कर्म केले जातात. मात्र या काळात पितरांच्या तिथी श्राद्ध कर्म शक्य न झाल्यास काय करावे यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, ज्या पितरांचे श्राद्ध कर्म हे त्यांच्या मृत तिथीला अडीअडचणींमुळे होत नसेल किंवा तिथीचे आपणाला विस्मरण झाले असेल तर निराश होण्याच कारण नाही. अशावेळी आपण सर्वपित्री अमावस्येला (Sarvpitri Amavsya) पितरांचे श्राद्ध करावे. 'सर्वपित्री' या नावातच सर्वकाही येत असल्याने या दिवशी दिवशी ज्या पितरांचे श्राद्धकर्म पितृपक्षात झाले नाही त्या सर्वपितरांसाठी या दिवशी श्राद्ध करावे.

Pitru Paksha 2022
Pitru Paksha : अकाली मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी त्रयोदशीचे श्राद्ध

सर्वपित्रीला करावे ही महत्वाची श्राद्ध कर्म

या काळात महालय सपिंडी श्राद्ध, ब्रम्हार्पण श्राद्ध, हस्त श्राद्ध, ब्राह्मणास शिदा दान, हिरण्य श्राद्ध, चट श्राद्ध हे श्राद्ध प्रकार शास्त्रात सांगितले गेले आहेत. या पैकी एक श्राद्ध यादिवशी आपल्या यथाशक्तीनुसार पुर्ण करावे. ज्याने पितरांचे आशिर्वाद आपल्याला प्राप्त होतील. या पैकी काहीही करण्यास जमले नाही तर थेट गायीला अन्न म्हणजे चारा टाकून पितरांचे स्मरण करावे याचेही मोठे पुण्य आपल्याला प्राप्त होते असे पं. धारणे सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com