Pitru Paksha : अकाली मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी त्रयोदशीचे श्राद्ध

कुटुंबातील लहान मुले, अकाली, अपघाती मृत्यू झालेल्यासाठी त्रयोदशीला श्राध्द केले जाते.
Pitru Paksha
Pitru Pakshaesakal

Trayodashi Shraddha 2022 : पितृ पक्षातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, एक विशिष्ट तिथी श्रद्धासाठी सर्वोत्तम मानली जाते. या तारखांवर श्राद्ध करणे पूर्वजांसाठी फायदेशीर आहे. शास्त्रनुसार, पूर्वजांना श्राद्ध केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूर्वजांचे आशीर्वाद अत्यंत महत्वाचे मानले गेले आहेत.

Pitru Paksha
Pitru Paksha : आपण अर्पण केलेले अन्न पितरांना मिळत कसं? धर्म अभ्यासक सांगतात

जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहित नसेल, तर हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही तारखांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावर पूर्वजांसाठी श्राद्ध करणे सर्वोत्तम मानले जाते. जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या मृत्यूची नेमकी तिथी माहित नसेल तर अशावेळी अपघाती, अकाली निधन किंवा बालक-बालिका यांचे श्राध्द करावे. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते असे मानले जाते.

Pitru Paksha
Pitru Paksha 2022 | जाणून घ्या कावळ्याला अन्न देण्याचे पर्यावरणपुरक महत्व

त्रयोदशी श्राध्द २०२२

हिंदू पंचांगानुसार २३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १वाजून १७ मिनीटांनी सुरूवात होऊन दुसऱ्या दिवशी २४ सप्टेंबर दुपारी २ वाजेपर्यंत हा कावधी आहे.

Pitru Paksha
Pitru Paksha 2022 | पितृपक्षात नविन वस्तूंची खरेदी करावी का? धर्म अभ्यासक सांगतात

लहान मुलांचे श्राध्द नियम

  • धर्मग्रंथांनुसार ज्या मृत मुलांची वयं २ किंवा त्यापेक्षा खालची असतात त्यांचे श्राध्द केले जात नाही.

  • धार्मिक मान्यतेनुसार २ त् ६ वर्षा दरम्यानच्या मुलांचेपण श्राध्द केले जात नाही. त्यांचे केवळ अंत्यसंस्कार केले जाते असे मानले जाते.

Pitru Paksha
Pitru Paksha 2022 | भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का..? जाणून घ्या कारण
  • सहा वर्षापुढील मुलांचे श्राध्द विधीवत करायला हवे. यासाठी पितृ पक्षातील त्रयोदशी हा दिवस योग्य समजला जातो. लहान मुलीचे निधन झाले असेल तर १० वर्षावरील मुलिंचे श्राध्द केले जाते.

  • तर अविवाहित कुमारांचे निधन झाले असेल तर त्यांचे श्राध्द पंचमीला केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com