Pitru Paksha 2022 : पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी 'या' गोष्टी आहेत आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pitru Paksha 2022

Pitru Paksha 2022 : पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी 'या' गोष्टी आहेत आवश्यक

Pitru Paksha 2022 Tritiya Tithi Shradha : १० सप्टेंबरला पितृपक्ष सुरु झाले. याच पितृ पक्षाच्या तृतीया तिथीचे श्राद्ध आज (१२ सप्टेंबर) आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात या गोष्टींशिवाय श्राद्ध करणे अपूर्ण मानले जाते. पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी तिथीचा मुहूर्त काय आणि श्राद्धासाठी कोणते साहित्य लागते. ते जाणून घ्या.

हेही वाचा: Pitru Paksha: यंदा पितृ पक्षातही करू शकतात शॉपिंग, 'या' तारखा आहेत शुभ

श्राध्द तिथी

  • अश्विन कृष्ण तिसरी तिथी सुरूवात : १२ सप्टेंबर २०२२, सकाळी ११.३५ पासून

  • अश्विन कृष्ण तिसरी तिथी समाप्त : १३ सप्टेंबर २०२२, सकाळी १०.३७ पर्यंत

हेही वाचा: Pitru Paksha : पितृ पक्षात श्राध्द करण्याचा महाभारताशी संबंध

तिसरी तिथी श्राद्ध मुहूर्त

  • कुतुप मुहूर्त : सकाळी ११.५८ वाजता ते दुपारी १२.४८पर्यंत

  • रौहीन मुहूर्त : सकाळी १२.४८ वाजता ते दुपारी १.३७ पर्यंत

  • अपराह्न काळ : सकाळी १.३७ वाजता ते सायंकाळी ४.०६ पर्यंत

हेही वाचा: Pitru Paksha 2022: पितृपक्षात या 5 पदार्थांमुळे लागू शकतो पितृदोष

श्राद्धसाठी लागणारे साहित्य :

पितृपक्षात या गोष्टींशिवाय श्राद्ध करणे अपूर्ण मानले जाते. श्राद्ध कर्मामध्ये तीळ, दर्भ, तांदूळ किंवा जव आणि तुळशी असणे फार महत्वाचे आहे.

हेही वाचा: Pitru Paksha 2022: नेमकी काय आहे पितृपक्षाची लोकप्रचलित कथा?

दर्भ : हिंदू धर्मात दर्भ (एक विशेष प्रकारचे गवत) अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जाते. श्राद्ध करताना अनामिकामध्ये दर्भापासून बनवलेली अंगठी, ज्याला पवित्री असेही म्हणतात, घालण्याचा नियम आहे. ते धारण करून श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दर्भाच्या पहिल्या भागात ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात महादेव वास करतात.

हेही वाचा: Pitru Paksha: या पितृपक्षाला करा टेस्टी तांदळाची खीर

तीळ : बृहन्नार्दीय पुराणानुसार श्राद्ध पक्षात आणि पिंड दानाच्या वेळी तीळ वापरल्याने पितरांना शांती मिळते. मान्यतेनुसार अकाली निधन झालेल्या नातेवाईकांच्या पाण्यात काळे तीळ मिसळून श्राद्ध केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो. धार्मिक ग्रंथानुसार तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामापासून झाली आहे. असे मानले जाते.

हेही वाचा: Pitru Paksha : यंदा 'या' तारखांना केले जाईल श्राद्ध

तुळशी : तुळशी अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. तुळशीचा वास पितरांना प्रसन्न करतो आणि त्यांचा आत्मा चिरंतन तृप्त राहतो, असे मानले जाते.

तांदूळ : पितृ पक्षात तांदळाची खीर बनवण्याची परंपरा आहे. तांदूळ हे संपत्ती आणि शीतलतेचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की तांदळाचे गोळे या हेतूने बनवले जातात की ते पितरांना थंडावा देतात आणि त्यामुळे त्यांचा आत्मा दीर्घकाळ तृप्त होतो. भात नसेल तर जवाचे गोळेही बनवले जातात. जव हे सोन्यासारखे शुद्ध मानले जाते.

Web Title: Pitru Paksha Trutiya Shraddha Important Tithi And Muhurta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pitru Paksha