

Vastu Shastra tips on plants to avoid near house like thorny cactus, peepal, banyan, milkweed, and ber trees that bring negative energy
esakal
वास्तुशास्त्रानुसार घराभोवतीचे वातावरण आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करते. घराच्या आसपास असलेली झाडे केवळ सौंदर्यच वाढवत नाहीत, तर ती ऊर्जेचा स्त्रोतही असतात. मात्र, काही झाडे आपोआप उगवून येतात, ज्यांना वास्तूत 'नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक' मानले जाते. ही झाडे घरात दरिद्री, वाद आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात, असे मानले जाते. नैसर्गिक दृष्टिकोनातून सर्व झाडे महत्त्वाची असली, तरी वास्तुशास्त्रातील नियमांनुसार घराच्या अगदी जवळ काही ठराविक प्रकारची झाडे असणे प्रगतीत अडथळा ठरू शकते.