esakal | नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; देवीच्या मूर्तीला मागणी आणि किंमत दोन्हीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Devi Idol

नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; देवीच्या मूर्ती महागल्या

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकार, विक्रेत्यांची उत्सवाची अंतिम तयारी टप्प्यात पोचली आहे. देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. जरी, चमकी आणि वेलवेटच्या रंगापासून तयार करण्यात आलेली, साडी नेसलेल्या देवीच्या मूर्तीला ग्राहकांची मोठी मागणी आहे. मूर्तीच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांना मूर्ती घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

बुकिंगला चांगला प्रतिसाद

गणेशोत्सवानंतर भक्तांना ओढ नवरात्रोत्सवाची असते. त्यासाठी देवीच्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली असून, ग्राहकांची जास्त मागणी असलेल्या मूर्ती साकारण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात सप्तशृंगी देवी, रेणुका माता रूपातील मूर्तींना सर्वाधिक मागणी असते. अशा मूर्ती ग्राहकांकडून बुक केल्या जात आहे. त्याचबरोबर तुळजापूरची महालक्ष्मी, दुर्गादेवी, एकवीरा देवी, वाघावर स्वार झालेली अंबामाता आदी विविध देवीचे रूपे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. गुरुवारी (ता.७) सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवातील देवीच्या मूर्तींची आताच बुकिंग केली जात असून बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्ती बनविण्यासाठी लाल, हिरवा, गुलाबी, पांढरा,भगवा आदी रंगाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. रंगासोबत मूर्तीला लावण्यात आलेली विविध आभूषणामुळे मूर्ती अधिक आकर्षक वाटते. मूर्तींना विविध प्रकारच्या आभूषणांसह विविध रंगाच्या आकर्षक साडी कारागिरांकडून तयार केल्या जात आहे. साडी नेसलेल्या देवीच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती मिळत असून, अशाच मूर्ती साकारण्याकडे कारागिरांचा कल आहे.

हेही वाचा: आदिमायेच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासचा प्रशासनाचा घाट

''घटस्थापनेला अवघे काही दिवस शिल्लक असून मूर्ती बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा गणेशोत्सवातील उत्साह नवरात्रोत्सवातही कायम असेल, अशी आशा आहे. मूर्तींची किंमत हजार ते दहा हजारापर्यंत असून, २० टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत.'' - हेमंत वानखेडे, मूर्तिकार-विक्रेता

हेही वाचा: भुजबळ-कांदे वाद : दोघांना समन्स; पो.आ.पांडेंची गंभीर दखल

loading image
go to top