
Rahu Gochar 2023 : नवीन वर्षात या ५ राशींवर राहील राहूचा सर्वाधिक प्रकोप, आता व्हा सावध
Rahu Rashi Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात सावकाश चाल राहुची असते. राहु कायमच उलट्या दिशेने म्हणजे वक्री चाल चालतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला त्याला दीड वर्ष लागतो. नवीन वर्षात ३० ऑक्टोबरला तो मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या ५ राशींना त्याचे परिणाम जास्त भोगावे लागणार आहेत.
तुळ - व्यापारात निरंकूश अनुभव घ्याल. पण विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा नुकसान भोगावं लागेल. भागीदारांसोबत सावधानीने वागा. या काळात वाद वाढतील. नोकरदार वर्गानेपण काळजी घेणं आवश्यक आहे.
हेही वाचा: New Year Astro Tips : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्मिळ शुभयोग, 'या' राशींची होईल भरभराट
मेष - राहुमुळे तुमची बुध्दी काही प्रमाणात भ्रमित होईल. प्रत्येक कामात घाईगडबड करू नका नाहीतर नुकसानासा सामोरं जावं लागेल. कौटुंबिक कलह वाढतील. सामंजस्याची भूमिका घेणं आवश्यक आहे. आहाराकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.
हेही वाचा: Astro Tips : शुक्रवारी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर...
मकर - राहु तुमच्या जीवनात अनेक उतार चढाव आणेल. कौटुंबिक संबंध खराब होतील. कुटुंब सावरण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील. घरात अशांतता जाणवेल. वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होतील. याकाळात तुम्हाला धैर्य ठेवत मोठमोठ्या गोष्टीपण समजूतदारपणे हाताळाव्या लागतील.
मीन - या वर्षी राहु तुम्हाला उत्तम धन मिळवून देईल, पण जेवढे पैशाच्या जवळ जाल तेवढेच कुटुंबापासून लांब व्हाल. त्यामुळे तुम्हाला फार विचारपुर्वक पावलं उचलण्याची गरज आहे. याशिवाय तब्येतीचीपण काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात आरोग्याच्या समस्या वाढतील.
वृषभ - नवीन वर्षात राहु तुमच्या खर्चात फार वाढ करेल. अनावश्यक खर्च होतील. मानसिक ताण वाढेल. पैसे कमवण्यासाठी शॉर्टकटचा मोह अडचणीत आणू शकतो. तब्येतीच्या तक्रारी वाढतील, दवाखान्याचा खर्च वाढेल.