

Government Jobs, Numerology Success Secrets
esakal
अंकशास्त्र हे केवळ आकड्यांचा खेळ नसून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भविष्याचा आरसा आहे. आपल्या जन्मतारखेवरून ठरणाऱ्या मुलांकाचा प्रभाव आपल्या संपूर्ण आयुष्यावर असतो. काही ठराविक तारखांना जन्मलेले लोक विशेष 'राजयोग' घेऊन जन्माला येतात. त्यांच्यामध्ये जन्मतजात नेतृत्वगुण आणि कष्टाची तयारी असते. विशेषतः सरकारी नोकरी आणि उच्च पदांवर विराजमान होण्याची क्षमता या लोकांमध्ये सर्वाधिक असते. मात्र यशाच्या शिखरावर असताना केलेली एक छोटीशी चूक त्यांना अर्ध्या वाटेत रोखू शकते त्यामुळे या राजयोगाचा लाभ घेण्यासाठी शिस्त आणि संयम पाळणे अत्यंत आवश्यक असते.