Raksha Bandhan 2022: सुतक पडलेले असताना रक्षाबंधन करावे का? बघू या काय सांगते शास्त्र | Raksha Bandhan 2022: Should Raksha Bandhan be done when someone dies in family | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Bandhan 2023

Raksha Bandhan 2023: सुतक पडलेले असताना रक्षाबंधन करावे का? बघू या काय सांगते शास्त्र

Raksha Bandhan Festival : लहानपणापासून मोठे होईपर्यंत ऐकमेकांसोबत वाढलेले भाऊ-बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी, लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो. बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात.

लौकिक स्वरुपात बहिण आपल्या प्रिय भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणींना भेटवस्तू देतो. हे एक प्रकारचे भक्तीचे आणि वरदानाचे नाते आहे. ज्यामध्ये अलौकिकरित्या अग्निदेव दिव्याच्या धगधगत्या ज्योतीचे साक्षीदार म्हणून उपस्थित असतात.

अक्षता, चंदन आणि कुंकू अलौकिकरित्या देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणेश आशीर्वाद बनून या उत्सवात भाऊ आणि बहिणीला शुभाशिर्वाद देतात. म्हणूनच सोयर किंवा सुतक असताना राखी सण साजरा करू नये, अशी मान्यता आहे. पण सुतकादरम्यानही राखीचा सण साजरा करायचा असेल तर काही नियम पाळले पाहिजेत.

यामुळे तुम्ही सुतक मर्यादा पाळू शकाल आणि राखीचा सण तुमच्याकडून चुकणार नाही. धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येते तेव्हा जन्माचे सोयर असते. तर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला की सुतक लागते.

एखाद्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर 12 दिवस सुतक पाळले जाते. तर विवाहित मुलीच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिला 4 दिवसांचे सुतक लागते. तसेच घरात मूल जन्माला आल्यानंतर 12 दिवसांचे सोयर असते. या काळात पूजा आणि धार्मिक कार्य केले जात नाही. रक्षाबंधनाच्या दिवसापासून 12 दिवसांपूर्वी कुटुंबात जन्म किंवा मृत्यू झाल्यास सुतक दोष मानले जाईल.

प्रत्येक कुटुंबात कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे सोयर-सुतक पाळले जाते. प्रत्येक घरातील प्रथा-परंपरा वेगळ्या असतात. सूतकादरम्यान भाऊ-बहिणी त्यांना हवे असल्यास रक्षाबंधन करू शकतात. मात्र, यामध्ये धार्मिक विधींचा समावेश होणार नाही याची काळजी घ्यावी. बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधावी पण तिलक लावू नये. तसेच भावाला औक्षणही करू नये. या दरम्यान पायांना स्पर्श करून नमस्कार करू नये. केवळ हात जोडून प्रणाम करावा.

भाऊ किंवा बहीण, जो कोणी लहान असेल त्याला नमस्कार करून मोठ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावा. सुतक दरम्यान रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधताना मनात राखीच्या मंत्राचे ध्यान करा. राखी बांधा आणि मंत्रोच्चार न करता ती बांधा, असे काही नियम सांगितले जातात. सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, आपापल्या घरातील रिती-परंपरा यांप्रमाणे करावे, असे सांगितले जात आहे.(Latest Marathi News)