
राशीनुसार राखी निवडल्याने भावाचं भाग्य आणि संरक्षण वाढतं, कारण प्रत्येक राशीशी विशिष्ट रंग आणि सामग्री जोडलेली असते.
कारण रंग ग्रहांशी संबंधित असतात.
रुद्राक्ष किंवा मोत्यासारख्या राखी वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करतात, ज्यामुळे भावाचं कल्याण होतं.
Zodiac Rakhi for protection from evil eye: यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. दरवर्षी हा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेले रक्षाबंधन हे स्वतःमध्ये खास आहे. बहिणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात आणि भावासाठी खास राखी निवडण्यासाठी खुप विचार करतात. भावांसाठी राखी निवडताना अनेक महिला नवीन डिझाइन आणि नमुन्यांकडे पाहतात, परंतु तुम्ही कधी तुमच्या भावाच्या राशीनुसार राखी खरेदी केली आहे का? जर तुम्ही राशीनुसार राखी खरेदी केली तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळतील. कोणत्या राशीसाठी कोणत्या प्रकारची राखी परिपूर्ण असेल हे आज जाणून घेऊया.