Jyeshtha Gauri Puja : गौरीपूजनाचं तुमच्या राशीला काय मिळणार फळ? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jyeshtha Gauri Puja

Jyeshtha Gauri Puja : गौरीपूजनाचं तुमच्या राशीला काय मिळणार फळ? जाणून घ्या

मेष - मानसिक ताण जाणवेल

या राशीचा चंद्र अष्टम स्थानात असून, मानसिक ताण जाणवेल. स्वभाव रागीट होईल. धन स्थानात मंगळ असल्याने काळजी घ्या. प्रवास योग येईल. एकूण बघता दिवस उत्तम राहिल.

वृषभ - शुभ वार्ता मिळेल

या राशीला आज शुभ वार्ता मिळेल. राशीच्या सप्तम स्थानात चंद्र आहे. मित्र मैत्रीणीना भेटण्याचा, सामाजिक जीवनात जोडीदाराच्या सोबत आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे. थोडी दगदग होईल.

हेही वाचा: भविष्य सोनेरी असावं... स्वातंत्र्याचं मोल कळावं...

मिथुन - आर्थिक घडामोडी घडतील

आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील.

कर्क - समाधीनकारक दिवस

पंचम चंद्र असल्याने धार्मिक गोष्टीत मन रमेल. संतती संबंधी शुभ काळ. प्रवास होतील. आर्थिक लाभ होतील. काहीसा तणाव वाटेल. एकूण दिवस समाधानात जाईल.

हेही वाचा: बालक-पालक : अगं अगं राशी!

सिंह - फार ताण घेऊ नका

आज चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल. फार ताण घेऊ नका. घरामध्ये जास्तीचे काम पडेल. मित्र मैत्रिणी भेटतील. धार्मिक कार्य घडेल. दिवस समाधानात जाईल.

कन्या - खर्च वाढतील

तृतीय स्थानातील चंद्र कार्यालयीन व घरगुती कामात वाढ करेल. खरेदीसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. खर्च होईल. धार्मिक कार्यक्रम होईल. आनंद आणि उत्साहात दिवस पर पडेल.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 सप्टेंबर 2022

तुळ - आर्थिक लाभ होतील

आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षण आणि कार्य क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. संततीसाठी भाग्य दायक योग. दिवस चांगला.

वृश्चिक - भाग्योदय

कुटुंबातील व्यक्तीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. दुपारनंतर सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.

हेही वाचा: 'राशी बेवफा है' 20 रुपयांची नोट होतेय व्हायरल!

धनु - काळजी घ्या

आज कार्यक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. धार्मिक बाबीत खर्च देईल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ.

मकर - प्रवासाचा योग

प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक खर्च होतील. भावंडा सोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील.

हेही वाचा: भविष्य घडविण्यासाठी चांगल्या व्यक्तिमत्वाचा ध्यास धरा

कुंभ - कार्यक्षेत्रात यश

आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनि सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. संततीला वेळ द्या. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ.

मीन - प्रत्येक क्षेत्रात यश

भाग्य स्थानातील चंद्र मनःस्वास्थ्य देईल. शुभ घटना घडतील. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. उत्तम असा दिवस आहे.

Web Title: Rashi Bhavishya Jyeshtha Gauri Puja 2022 Moon Sign

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..