Religion and Tradition : पूजेच्या वेळी कलश का ठेवला जातो? काय आहे त्याचं महत्त्व...

हिंदू धर्मग्रंथानुसार कलश हे सुख, समृद्धी, वैभव आणि शुभेच्छांचं प्रतीक मानलं जातं.
Culture and Religion
Culture and ReligionSakal
Updated on

हिंदू धर्मात पूजा आणि शुभ कार्याच्या वेळी कलश लावण्याचं विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार कलश हे सुख, समृद्धी, वैभव आणि शुभेच्छांचं प्रतीक मानलं जातं. देवी पुराणात एक व्याख्यान आहे की माँ भगवतीची पूजा करताना प्रथम कलशाची स्थापना करावी. कलश स्थापना प्रथम घरी किंवा मंदिरात आयोजित विधी आणि पूजा पाठांमध्ये केली जाते.

हिंदू धर्मात कलश हे विश्व, विराट, ब्रह्मा आणि पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. सर्व देवतांची शक्ती त्यात सामावलेली आहे, असं मानलं जातं. पूजेच्या वेळी कलशस्थापना ही देवीची शक्ती, तीर्थयात्रा इत्यादींचे प्रतीक मानून स्थापना केली जाते.

हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखात भगवान विष्णू, कंठात भगवान शिव आणि तळात ब्रह्मा विराजमान आहेत. दैवी मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी राहतात. कलशात भरलेलं पाणी हे थंड, स्वच्छ आणि शुद्ध असावं. त्याचबरोबर हे पाणी राग, आसक्ती, माया, द्वेष या भावनांपासून दूर राहायलाही शिकवते. (Religion and Tradition)

Culture and Religion
Hindu Religion : लग्नातल्या सप्तपदीचं महत्व अन् 7 आकड्या मागचं रहस्य माहितीये? जाणून घ्या सविस्तर

कलशाची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला कोणतं कलश स्थापनेसाठी वापरायचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे. कलश स्थापनेसाठी नेहमी फक्त सोने, चांदी, तांबे किंवा मातीची भांडी वापरावीत. लोखंडी कलश कधीही पूजेसाठी वापरू नये. कलशाची स्थापना करताना दिशेचं ज्ञान असणंही खूप महत्वाचं आहे. कलशाची स्थापना नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला करावी.

कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम ज्या ठिकाणी कलश उभारला जाणार आहे. ती जागा पूर्णपणे स्वच्छ करावी. त्यानंतर त्या ठिकाणी गंगाजल शिंपडा. त्यानंतरच कलशाची स्थापना करावी. कलश ठेवण्यासाठी मातीची वेदी बनवावी आणि हळदीने अष्टकोनी बनवावी. कलशात पंचपल्लव, पाणी, दुर्वा, चंदन, पंचामृत, सुपारी, हळद, अक्षत, नाणे, लवंग, वेलची, सुपारी टाकून त्याची प्रतिष्ठापना करावी.

कलश बसवल्यानंतर त्यावर स्वस्तिक बनवावे. कलशावर बनवलेलं हे स्वस्तिक चिन्ह चार युगांचं प्रतीक मानलं जातं. कलशाची स्थापना करताना जव किंवा गहू कलशाखाली ठेवावा आणि कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवावा. यानंतर कलशाची पंचोपचाराने पूजा करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com