Rudraksh Niyam: रुद्राक्ष धारण केला असेल तर करू नका या चुका, अन्यथा होईल नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rudraksh

Rudraksh Niyam: रुद्राक्ष धारण केला असेल तर करू नका या चुका, अन्यथा होईल नुकसान

हिंदू धर्मात रुद्राक्ष (Rudraksh) अत्यंत पवित्र मानला जातो. याला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली होती. म्हणूनच हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. प्राण्यांच्या कल्याणासाठी अनेक वर्षे तपस्या केल्यावर जेव्हा भगवान शंकराने डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळातून अश्रू पडले आणि धरती मातेने रुद्राक्ष वृक्षांना जन्म दिला. अनेकजण रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष एका मुखीपासून चौदा मुखींपर्यंत असतो. प्रत्येक रुद्राक्षाचे स्वतःचे महत्त्व असते. अशा परिस्थितीत रुद्राक्ष धारण करताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने या नियमांचे पालन करावे अन्यथा भगवान शंकराचा कोप होऊ शकतो. कोणते आहेत ते नियम जाणून घेऊया

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : देशभरात म्हटल्या जाणाऱ्या गणेशाच्या ३ आरत्या

रुद्राक्ष धारण करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

● रूद्राक्ष घालण्याआधी अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

● रूद्राक्षाची चांगल्या शुभ दिवशी पूजा करून मगच तो घालावा.

● रुद्राक्ष हा आपल्या पैसाने खरेदी करून मगच घालावा.

● दुसर्‍याने घातलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका किंवा तुमचा रुद्राक्ष दुसर्‍याला घालू नका.

● रुद्राक्षाची माळ बनवताना लक्षात ठेवा की त्यात किमान 27 मणी असावेत.

हेही वाचा: Shravan 2022: श्रावण महिन्यात चुकूनही वाजवू नका शंख

रुद्राक्ष धारण केल्यावर कोणते नियम पाळावे?

● तुम्ही जर का अंत्यसंस्कार कार्यक्रमात जाणार असाल तर रुद्राक्ष घालून जाऊ नये.

● रुद्राक्षाला घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये.

● रात्री झोपताना रुद्राक्ष काढुन ठेवावा.

● रुद्राक्षाची माळ नेहमी आंघोळीनंतरच घालावी.

● रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा. काळ्या धाग्यात कधीही घालू नये.

● रुद्राक्ष धारण केल्यानंतर मटन मांसाहार करणे टाळावे.

● असे केल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते.

● रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने दररोज भगवान शंकराची पूजा करावी. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात.

Web Title: Rudraksh Niyam Dont Make These Mistakes While Wearing Rudraksh Otherwise It Will Cause Damage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..