Indian Railways
esakal
शनीच्या नक्षत्रातील बदलाचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असतो. ९ ऑक्टोबर रोजी शनीने नक्षत्रबदल केला असून, ते सध्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रात गोचर करत आहेत. ८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत शनी याच नक्षत्रात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. या काळात वृषभ, मिथुन, तूळ, मकर आणि कुंभ या पाच राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता ज्योतिषी पंडित नरेंद्र उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, पुढील १११ दिवस या राशींच्या लोकांसाठी नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये काही चांगल्या संधी मिळू शकतात.