देशी गोवंशाची शास्त्रशुद्ध गाथा

गेल्या काही वर्षांत गोपालन आणि गोसंवर्धन क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. शेतीच्या बरोबरीने एक आश्वासक पूरक उद्योग म्हणून पशुपालन हा व्यवसाय पुढे आला आहे.
Deshi Govansh
Deshi GovanshSakal

आपल्या वातावरणात रुळलेले, शेकडो वर्षांत जाणीवपूर्वक विकसित केलेले देशी गोवंश गेले कोठे? आता देशी गोधनाला पूर्वीचे वैभव कसे प्राप्त होईल? हा महत्त्वाचा विषय सर्वांच्या पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले ‘देशी गोवंश’ पुस्तक हे देशी गाईंचे संगोपन करणारे पशुपालक, तसेच यामध्ये पुढे धोरणात्मक कार्य करणाऱ्या लोकांना मार्गदर्शक ठरणारे आहे.

गेल्या काही वर्षांत गोपालन आणि गोसंवर्धन क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. शेतीच्या बरोबरीने एक आश्वासक पूरक उद्योग म्हणून पशुपालन हा व्यवसाय पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर पशुपैदास आणि व्यवस्थापनासंबंधी तंत्रज्ञानाचा विकास होताना दिसतो. माज नियंत्रण व संमिलीकरण, भ्रूण प्रत्यारोपण, सेक्स्ड सीमेन, वळूंची क्षमता अजमावण्यासाठी संतती परीक्षण इत्यादी पैदास तंत्रज्ञान प्रत्यक्षात अमलात येऊ लागले आहे. देशामध्ये गो संकरीकरणाचा आवाका वाढत असताना मात्र ‘ब्रीडिंग पॉलिसी‘चा विसर पडून देशी गोवंशाचेदेखील संकरीकरण होऊ लागले. त्यामुळे आपल्या वातावरणात रुळलेले, शेकडो वर्षांत जाणीवपूर्वक विकसित केलेले देशी गोवंश गेले कोठे? आता देशी गोधनाला पूर्वीचे वैभव कसे प्राप्त होईल? हा महत्त्वाचा विषय सर्वांच्या पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशी गोवंश’ पुस्तक हे देशी गाईंचे संगोपन करणारे पशुपालक, तसेच यामध्ये पुढे धोरणात्मक कार्य करणाऱ्या लोकांना मार्गदर्शक ठरणारे आहे.

देशी गोवंश पुस्तकामधील विविध प्रकरणांमध्ये भारतीय गोवंशाच्या जाती, संगोपन, आहार, पैदास, प्रजनन धोरण, आरोग्य व्यवस्थापन, उत्पादनांची निर्मिती, जातिवंत गोवंशाची निवड आणि खरेदी, पशुपैदासकार संघटना आणि प्रयोगशील पशुपालकांच्या यशोगाथांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत देशी गोवंश आपल्या गोठ्यामध्येच कसा विकसित होऊ शकतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार पुस्तकामध्ये विविध विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रकरणातून पशू व्यवस्थापनाबाबत नवीन तांत्रिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन होणे भविष्यकालीन दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, हे निर्विवाद सत्य आहे. त्यादृष्टीने गो-उत्पादने आणि यशोगाथा हे विभाग दिशादर्शक आहेत. याचबरोबरीने शासकीय आणि अशासकीय स्तरावर असलेल्या योजना तसेच उपक्रमांची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे.

परदेशातील गोधनाचा विचार केला तर असे दिसून येईल, की गोवंश सुधारण्यासाठी केवळ अभिनिवेश उपयोगाचा नाही; तसेच प्रत्येक गोष्ट शासनाने करावी ही अपेक्षाही फोल आहे. त्याऐवजी प्रयोगशील गोपालकांनी समान उद्दिष्टाने एकत्र येणे, विचार मंथन करणे, नवीन तंत्रज्ञानाची कास धरणे आणि आपला ‘ब्रँड’ निर्माण करणे गरजेचे आहे. विभागनिहाय प्रत्येक गोवंशाची पशुपैदासकार संघटना ही संकल्पना समविचारी गोपालकांनी उचलून धरावी, हा संदेशही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हे पुस्तक पोचवते.

‘देशी गोवंश’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती जुलै, २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली. आजपर्यंत या पुस्तकाच्या मराठी भाषेतील सहा आणि हिंदी भाषेतील एक आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. गेल्यावर्षी देशी गोवंश पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे ‘डॉ. राजेंद्र प्रसाद पुरस्कारा‘ने सन्मानित करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com