esakal | चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर पडेल अधिक प्रभाव?
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रग्रहण

चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्वाबरोबर वैज्ञानिक महत्त्व देखील तितकेच आहे.

चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर पडेल अधिक प्रभाव?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

2021 या वर्षात दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:34 वाजता होईल आणि सायंकाळी 05:33 वाजता संपेल आहे. हे चंद्रग्रहण भारतात उपछाया ग्रहण म्हणून दिसणार आहे. या वर्षातील म्हणजेच 2021 मधील शेवटचे चंद्रग्रहण युरोप, भारत, उत्तर-पश्चिम आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि आशियातील अनेक भागांमधून दिसणार आहे. चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्वाबरोबर वैज्ञानिक महत्त्व देखील तितकेच आहे. चंद्रग्रहणाला ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. काही मंदिरामध्ये प्रवेश करण्यास सुद्धा बंदी असते. शास्त्रज्ञांच्या मते, ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते, तेव्हा चंद्रावर पडणारा प्रकाश अडतो, याला चंद्रग्रहण असेही म्हणतात.

हेही वाचा: संपुर्ण भारतात दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

चंद्रग्रहणात या राशींवर प्रभाव पडेल...

या चंद्रग्रहणादिवशी 19 नोव्हेंबर ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी आहे. या दिवशी वृषभ आणि कृतिका नक्षत्रामध्ये चंद्रग्रहण असणार आहे. ज्योतिषांच्या मते, या राशी आणि नक्षत्रामध्ये जन्माला आलेल्या लोकांनी सावधगिरी पाळावी. या राशीच्या लोकांनी या दिवशी वाद-विवाद करण्यापासून दूर राहावे. तसेच प्रवासा करताना किंवा वाहन चालवतानासुध्दा काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा: शतकातील सर्वाधिक कालावधीचे चंद्रग्रहण 27 अन्‌ 28 जुलैला होणार

चंद्रग्रहणानंतर नेमकं काय करावे...

- धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणा संपल्यानंतर आंघोळ करावे. असे मानले जाते की स्नान केल्याने ग्रहणाचा प्रभाव कमी होतो. आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी घालून स्नान केले पाहिजे.

- ग्रहण संपल्यानंतर गंगेचे पाणी घरात शिंपडावे.

- त्यानंतर मंदिरातील देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावे.

- त्यानंतर गाईला चपाती खायला द्यावी, असे करणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार गाईला खायला दिल्याने घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात., घरात सुखशांती राहते.

loading image
go to top