

MONEY LUCK
esakal
Marathi Rashi Bhavishya : सप्टेंबर महिना काही ठराविक राशींसाठी आर्थिकदृष्ट्या खूप खास ठरणार आहे. ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या राशींच्या आयुष्यात धनलाभाचे अनेक योग निर्माण होऊ शकतात. वर्षानुवर्षे अडकलेला पैसा परत मिळण्यासोबतच उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होण्याची शक्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला सुख-सुविधा, वैभव, प्रेम आणि आर्थिक समृद्धीचा कारक मानले जाते. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तूळ, मिथुन आणि मकर या ३ राशींना आर्थिक बाबतीत मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत.