Shani Sadhe Sati: 'या' राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती तर या राशींना मिळेल मुक्ती

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिच्या राशीत परिवर्तन झाल्याने काही राशींवर शनि देवाच्या साडेसातीला सुरूवात होणार आहे
Shani Sadhe Sati
Shani Sadhe Satiesakal

Shani Dev: दंड आणि न्यायाचा स्वामी मानला जाणाऱ्या शनिदेवास न्यायाचा कारक मानला जातो. शनि देव चांगल्यास चांगल्या कर्माचे आणि वाईट करणाऱ्यास वाईट कर्माचे फळ देतो. त्यामुळे शनिचा कोप आणि साडेसाती लागणं अशुभ मानल्या जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिच्या राशीत परिवर्तन झाल्याने काही राशींवर शनि देवाच्या साडेसातीला सुरूवात होणार आहे. येत्या 2023 मध्ये काही राशींवर शनिदेवाचा कोप होईल तर काही राशींना यातून मुक्ती मिळेल.

या राशींवर होणार प्रभाव

मिथुन: - ज्योतिषीय गणनेनुसार, 17 जानेवारी 2023 मध्ये मिथुन राशीच्या लोकांना साडेसातीतून मुक्ती मिळेल. कारण 20 एप्रिल 2022 ला शनिच्या कुंभ राशीत येण्याने कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू झाली होती.

धनु: ज्योतिषीय गणनेनुसार, 17 जानेवारीच्या 2023 मध्ये धनु राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कोपातून मुक्ती मिळेल.

कुंभ: 24 जानेवारी 2020 पासून सुरू झालेली कुंभ राशीच्या लोकांवरील साडेसाती 23 फेब्रुवारी 2028 मध्ये शनि मार्गी लागल्यास त्यांना मुक्ती मिळेल.

मीन: 29 एप्रिल 2022 मध्ये शनिचा कुंभ राशीत प्रवेश झाल्याने मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू झाली होती. ही साडेसाती 2030 पर्यंत राहाण्याची शक्यता आहे.

मकर: ज्योतिषीय गणनेनुसार, 26 जानेवारी 2017 मध्ये मकर राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती सुरू झाली होती. ही साडेसाती 29 मार्च 2025 पर्यंत राहील.

Shani Sadhe Sati
Shani Astro Theory : तुमच्या कुंडलीतील शनी ठरवतो आयुष्याची दिशा, जाणून घ्या महत्वपूर्ण सिद्धांत

साडेसातीचं महत्व

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक माणसाच्या जीवनात साडेसाती तीन वेळा येत असते. या काळात माणसास शारीरिक आणि मानसिक दु:खांचा सामना करावा लागतो. असे मानले जाते की, साडेसातीदरम्यान गरीब आणि असहाय्य लोकांना त्रास दिल्यास शनिदेव आणखी क्रोधित होतात. (Rashi)

Shani Sadhe Sati
Ravan Shani Dev Katha : रावणामुळे शनिदेवाची साडेसाती अडीच वर्ष भोगावी लागते; जाणून घ्या कथा

साडेसातीवर उपाय

साडेसातीपासून वाचण्यासाठी शनि देवास प्रसन्न ठेवावे. त्यामुळे तुमच्या जीवनात सगळं सुरळीत चालेल. साडेसातीत शनि देवास दान, मंत्र जाप किंवा पूजा केल्यास तुम्हाला फायदा होतो. शास्त्रात शनिच्या औषधी स्नानाबाबत सांगण्यात आलंय. शनि देवास शांत ठेवण्यासाठी शनि देवाच्या बीज मंत्राच्या कमीत कमी तीन माळांचा जाप करावा. मंत्रोच्चाराची पूर्व कल्पना जरूर असावी.

डिस्क्लेमर: ज्योतिषीय मान्यतेनुसार ही माहिती असून सकाळ समुहाशी याचा काहीही संबंध नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com