Shani Jayanti 2022 : शनि देवाला या उपायांनी करा प्रसन्न

Shani Jayanti
Shani JayantiShani Jayanti

शनिदेवाला न्यायाचा देवता म्हणतात. शनिदेव कर्माचे दाता आहे. माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेव एखाद्यावर रागावतात तेव्हा त्याला कठोर शिक्षा देतात. तसेच ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असते त्याला ते राजा बनवतात. शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि जयंती (Shani Jayanti) विशेष मानली जाते. असे मानले जाते की शनि जयंतीच्या दिवशी केलेली पूजा आणि उपाय केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात.

यावेळी शनि जयंतीला शनिदेव (Shani Jayanti) स्वतःच्या कुंभात विराजमान आहेत. शनि जयंतीला सुमारे ३० वर्षांनी ग्रहांचा हा संयोग होत आहे. यासोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. वट सावित्री व्रत, सोमवती अमावस्याही याच दिवशी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, शनि जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. कारण, या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस शनि जयंती म्हणून साजरा केला जातो.

यावर्षी शनि जयंती सोमवारी (ता. ३०) येत आहे. शनि जयंतीचा (Shani Jayanti) शुभ मुहूर्त (Auspicious moment) २९ मे रोजी दुपारी २.५४ वाजता सुरू होईल आणि ३० मे रोजी दुपारी ४.५९ वाजता संपेल.

या राशींसाठी शनि जयंती विशेष असेल

  • कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची ढैय्या सुरू आहे.

  • कुंभ, मकर आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे.

  • या पाच राशींसाठी यंदाची शनि जयंती खूप खास असणार आहे.

  • शनिदेवाची साडेसाती आणि ढैय्याने ग्रस्त असलेल्या लोकांनी शनिदेवाची मनोभावे पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होईल.

  • जो व्यक्ती या दिवशी शनिदेवाची पूजा करतो त्याच्यावर शनिदेवाची वाईट दृष्टी पडत नाही.

शनिदेवाला करा असे प्रसन्न

  • शनि जयंतीच्या दिवशी भगवान शंकराला काळ्या तीळ मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करा. असे केल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते.

  • शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला अपराजितेच्या फुलांची माळ अर्पण करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

  • शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरीब आणि गरजूंना क्षमतेनुसार दान करा.

  • शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com