

Shani Margi 2026: Saturn Direct Brings Wealth to 4 Zodiac Signs
esakal
Astrology Forecast 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवांना कर्माचे फळ देणारे आणि न्यायाचे देवता मानले जाते. व्यक्तीला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांनुसार फळ देणारे शनी जेव्हा जेव्हा आपली चाल बदलतात किंवा मार्गी होतात, तेव्हा त्याचा थेट प्रभाव संपूर्ण १२ राशींच्या जीवनावर पडत असतो. येत्या ११ डिसेंबर २०२६ ला शनिदेव मीन राशीमध्ये सरळ मार्गाने मार्गक्रमण (मार्गी) करणार आहेत.
शनीच्या या गोचर परिवर्तनामुळे काही ठराविक राशींच्या जातकांना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात अफाट यश मिळण्याची दाट शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया, डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या शनीच्या या मार्गी चालींमुळे कोणत्या चार राशींचे नशीब उजळणार आहे.