
Shaniwar Upay: शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. ज्या भक्तांवर शनिदेव खुश असतात त्यांच्या सगळ्या समस्या दूर होतात. आणि त्यांना सुखसमृद्धी आणि धनप्राप्ती होते असे मानले जाते. म्हणून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विधी पूर्वक उपासना केली जाते. तसेच ज्योतिषही आपल्याला काही उपाय सांगतात.
आज शनिवारी आहेत हे योग
आज शनिवारी अति शुभ योग यायीजय योग बनलेला आहे. या शुभ योगात महत्वपूर्ण उपाय केल्यास तुम्हाला त्याचं निश्चित फळ मिळतं. यासोबतच विष्कुम्भ योगाचाही निर्माण होताना दिसतो. विकुम्भ योगाची अशुभता दूर करण्यासाठी शनिवारचे उपाय फार शुभ मानल्या जाते.
यायीजय योग
ज्योतिषशास्त्रानुसार यायीजय योग अतिशय शुभ मानल्या जातो. या योगात तुम्ही तुमच्या मनातलं शनिदेवाला सांगता आणि तुमच्या प्रार्थना ऐकण्याची विनंती करता. याच योगाने पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.
विष्कुम्भ योग
ज्योतिष शास्त्रानुसार विष्कुम्भ योग अशुभ मानल्या जातो. हा योग विषाप्रमाणे घातक असल्याने यास विष्कुम्भ योग असे म्हटले जाते. या योगात कोणतेच कार्य सफल होत नाही. या योगाचं निर्माण शनि आणि चंद्राच्या युतीने होते. या योगाची अशुभता कमी करण्यासाठी शनिदेवाचे उपाय महत्वाचे ठरतात.
शनिवारी करा हे उपाय
शनिवाऱ्या दिवशी कुठल्याही शनि मंदिरात जाऊन सकाळ संध्याकाळ सरसोच्या तेलाचा आणि काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावा. तसेच शनि चालीसा आणि शनि आरतीचे पाठ करा.
शनिवारी रात्री हनुमानाच्या मूर्तीपुढे चारमुखी दिवा लावा. त्यानंतर ‘ ॐ अंजनी सुताये नमः’ मंत्राचा 11-21 वेळा जाप करा.
शनिवाऱ्या दिवशी काळी उडद दाळचे दान करावे. या दिवशी काळ्या उडद दाळीची कचोरी किंवा पकोडे बनवून गरीबांना वाटा. असे केल्यास शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होईल.