Shardiya Navratri 2023 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून आदिशक्तीचा जागर; उत्सवकाळात 'असा' चालणार महापूजेचा कार्यक्रम

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) आज (रविवार) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri Festival) प्रारंभ होणार आहे.
Shardiya Navratri 2023 Ambabai Temple Kolhapur
Shardiya Navratri 2023 Ambabai Temple Kolhapuresakal
Summary

उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच भाविकांनी शहरात एकच गर्दी केली असून, पहिल्याच दिवशी दर्शनासाठी झुंबड उडणार आहे.

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपिठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) आज (रविवार) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri Festival) प्रारंभ होणार आहे. सकाळी आठच्या सुमारास घटस्थापना आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे तोफेची सलामी दिली जाणार आहे.

दरम्यान, उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच भाविकांनी शहरात एकच गर्दी केली असून, पहिल्याच दिवशी दर्शनासाठी झुंबड उडणार आहे. दरम्यान, दुर्गा ज्योती नेण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांनी मोठी गर्दी केली. स्वप्नील हिडदुगी आणि परिवारातर्फे नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मंदिर हजारो फुलांनी सजवण्यात आले.

Shardiya Navratri 2023 Ambabai Temple Kolhapur
Shambhuraj Desai : पालकमंत्र्यांनी उरकले 'चटावरचे श्राद्ध'; आरोग्य सेवेबाबत शंभूराज देसाई कधी दाखवणार गांभीर्य?

अंबाबाई मंदिरात घटस्थापनेनंतर घंटानाद होईल. त्यानंतर विविध धार्मिक विधी होऊन दुपारी दोनच्या सुमारास देवीची पारंपरिक अलंकार पूजा बांधली जाणार आहे. उत्सवकाळात रात्री साडेनऊला पालखी सोहळा होणार असून, मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही पारंपरिक पध्दतीने घटस्थापना होणार आहे.

उत्सवकाळात देवीची रोज विविध रूपांत सालंकृत पूजा बांधली जाणार आहे. शहरातील नवदुर्गा मंदिर परिसरही विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी आज बाजारपेठेत गर्दी राहिली. दरम्यान, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन केले आहे. एकूणच उत्सवावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

थेट दर्शनासाठी मोठ्या चार स्क्रीनची व्यवस्था

अंबाबाई मंदिर परिसरात दर्शनरांगेबरोबरच चप्पल स्टॅंड, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, लॉकर्स आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. थेट दर्शनासाठी मंदिर परिसरात १२ बाय १० फुटांच्या कायमस्वरूपी चार स्क्रीन बसवल्या असून, शहरातील दहा ठिकाणी तात्पुरत्या एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतही टीव्ही स्क्रीनवरून थेट दर्शन मिळणार आहे. त्याशिवाय देवस्थान समितीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून देवीसह पालखी सोहळ्याचे थेट दर्शन अनुभवता येणार आहे.

Shardiya Navratri 2023 Ambabai Temple Kolhapur
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंत्रिपदाची 'पहिली माळ' मकरंद आबांच्या गळ्यात? साहेबांच्या बालेकिल्ल्यात दादांची हवा!

उत्तरेश्वर पेठेत उत्साह

शहरात उत्तरेश्वर पेठ परिसरात प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपांची उभारणी केली असून, परिसर विद्युतरोषणाईने सजला आहे. येथे उद्या (रविवारी) दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. उत्सवकाळात विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह रास-दांडिया रंगणार आहे.

मोबाईल ॲपचे आज उद्‍घाटन

राज्यासह देशातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आयओएस आणि ॲंड्रॉईड बीटा व्हर्जन मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Shardiya Navratri 2023 Ambabai Temple Kolhapur
Success Story : सेवानिवृत्त दाम्पत्यानं 70 एकरात कातळावर फुलवली 'ड्रॅगन फ्रूट'ची बाग; राजापुरात पहिलाच प्रयोग, तब्बल 3 लाखांचं उत्पन्न

शासनाने हे ॲप उपलब्ध करून देऊन पर्यटकांना दसरा भेट दिली आहे. या मोबाईल ॲपचे उद्‍घाटन उद्या (रविवारी) सायंकाळी पाच वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, भवानी मंडप पागा बिल्डिंग येथे पर्यटन माहिती केंद्राचेही उद्‌घाटन होणार आहे.

महालक्ष्मी अन्नछत्र सज्ज

अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उत्सव काळात महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नछत्र उपक्रम होणार आहे. रोज आठ ते दहा हजार भाविकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत ही सुविधा महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये उपलब्ध असेल..

मंदिरातील आजचे सांस्कृतिक कार्यक्रम

दुपारी दीड : ओम महिला भजनी मंडळ, दुपारी तीन : सुरश्री महिला भजनी मंडळ (मुंबई), सायंकाळी चार : अनुराग भावभक्ती मंडळ, सायंकाळी सव्वापाच : वैभवी चोपडेचे भरतनाट्यम, सायंकाळी साडेसहा : ऋतिका साळोखे, रसिका विभूते यांचे भरतनाट्यम

Shardiya Navratri 2023 Ambabai Temple Kolhapur
वाघनखं खरी की खोटी? उदयनराजेंनी राजवाड्यातील मोठ्या चोरीचा सांगितला इतिहास, नेमकं काय घडलं?

उत्सवकाळातील श्री अंबाबाईच्या पूजा अशा...

  • रविवार (ता.१५) : पारंपरिक बैठी पूजा

  • सोमवार (ता.१६) : श्री महागौरी पूजा

  • मंगळवार (ता.१७) : श्री कामाक्षीदेवी पूजा

  • बुधवार (ता.१८) : श्री कुष्मांडादेवी पूजा

  • गुरुवार (ता.१९) : पारंपरिक गजारूढ पूजा

  • शुक्रवार (ता.२०) : श्री मोहिनी अवतार पूजा

  • शनिवार (ता.२१) : श्री नारायणी नमोस्तुते पूजा

  • रविवार (ता.२२) : पारंपरिक महिषासूरमर्दिनी पूजा

  • सोमवार (ता.२३) : श्री दक्षिणामूर्तिरुपिणी पूजा

  • मंगळवार (ता.२४) : पारंपरिक रथारूढ पूजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com