घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंत्रिपदाची 'पहिली माळ' मकरंद आबांच्या गळ्यात? साहेबांच्या बालेकिल्ल्यात दादांची हवा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय अंतिम झाला आहे.
Shinde Government Cabinet expansion MLA Makarand Patil
Shinde Government Cabinet expansion MLA Makarand Patilesakal
Summary

मकरंद पाटील यांच्या मंत्रिपदाचे फायनल झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत.

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय अंतिम झाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यालाही आणखी एक मंत्रिपद नक्की झाले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावरच आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांना कॅबिनेट मंत्रिपद (Cabinet Minister) मिळणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

Shinde Government Cabinet expansion MLA Makarand Patil
Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण मिळणार? 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी; पडळकरांनी दिली महत्त्वाची अपडेट

त्यामुळे ऐनवेळी निर्णयात बदल न झाल्यास सध्या मुंबईत असलेले श्री. पाटील नवरात्रात मंत्रिपदाची माळ घालूनच जिल्ह्यात येतील. शिवसेनेतून सवतासुभा केल्यानंतर एकनाथ शिंदे गट व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ते होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत अजित पवारही सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या गटाच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच वेळी वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरचे आमदार मकरंद पाटील यांचेही नाव मंत्रिपदाच्या यादीत होते; परंतु कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेत त्यांनी मंत्रिपद घेणे टाळले होते.

दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यातही ते सहभागी झाले होते; परंतु त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून शिंदे गट ते अन्य मित्र पक्ष व सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोर लावला होता. त्यावर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खलबते सुरू होती.

Shinde Government Cabinet expansion MLA Makarand Patil
Loksabha Election : 'जय शिवराय' संघटना लढवणार लोकसभा निवडणूक; अध्यक्ष शिवाजीराव मानेंची घोषणा

अखेरीस मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय अंतिम झाला आहे. त्यामध्ये जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळणार आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या गळ्यात घटस्थापनेच्या दिवशीच मंत्रिपदाची माळ पडणार आहे. अजित पवार यांचा गट ऊर्जा व ग्रामविकास या दोन खात्यांसाठी विशेष आग्रही आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांना या दोन्हीपैकी एक खाते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Shinde Government Cabinet expansion MLA Makarand Patil
Rajan Salvi : उदय सामंतांविरुद्ध राजन साळवींनी केलेल्या 'त्या' अपशब्दाचा शिंदे गटानं केला निषेध; असं काय म्हटलं आमदारानं?

मकरंद पाटील यांच्या मंत्रिपदाचे फायनल झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. मंत्रिपदाबरोबरच साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवार यांचा गट अत्यंत आग्रही आहे. सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचेही पालकमंत्रिपद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील पद महत्त्वाचे आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारीही येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com