Devotional Journey: शेगाव वारीचा अलौकिक अनुभव! डोळे भरून दर्शन घेताच जीवन कृतार्थ झालं

shegaon ekadashi yatra spiritual experience: जगातील सर्व सुखे समाधान हे महाराजांच्या चरणी आहे याची ग्वाही पुन्हा पुन्हा दर्शनातून मिळत असते. असीम शांतता अनुभवायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे आपल्या सद्गुरूंचे दर्शन मग ते शिर्डी , शेगाव , अक्कलकोट कि अजून काहीही असो.
shegaon ekadashi yatra spiritual experience

shegaon ekadashi yatra spiritual experience

Sakal

Updated on

परवा एकादशीला त्यांच्याच कृपेने शेगाव ची वारी घडली. डोळे भरून किती पाहू आणि किती नको असे मला झाले होते. अंगरखा घातलेले , फुलांनी सजवलेले आणि सरते शेवटी फेटा घालून प्रत्येक भक्ताला भरभरून आशीर्वाद देणारी तिन्ही रूपे पाहता आली. खरच जीवन कृतार्थ झाले. जगातील सर्व सुखे समाधान हे महाराजांच्या चरणी आहे याची ग्वाही पुन्हा पुन्हा दर्शनातून मिळत असते. असीम शांतता अनुभवायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे आपल्या सद्गुरूंचे दर्शन मग ते शिर्डी , शेगाव , अक्कलकोट कि अजून काहीही असो. गुरुतत्व अनुभवणे हे महत्वाचे. जीवनातील सगळ्या दुक्खांची होळी करणाऱ्या त्यांच्या पदस्पर्शानी पुनीत झालेल्या ह्या तीर्थांचे जेव्हा दर्शन घडते तेव्हा जीवनातील सर्व आसक्ती संपुष्टात येतात. आपल्यातील षड्रिपूंना संपवायचे असेल तर त्याची सुरवात नामस्मरणाने होते हे निश्चित. महाराजांच्या पोथीचे पारायण प्रदक्षिणा, तीर्थ, महाप्रसाद अजून काय हवे जीवनात. घरी आले आहे पण मन तिथेच त्यांच्याच चरणाशी गुंतलेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com