Shravan 2022 : खानदेशात कानुबाई उत्सवाची धूम; रोट पूजनासाठी कुटुंबे एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanubai rot

Shravan 2022 : खानदेशात कानुबाई उत्सवाची धूम; रोट पूजनासाठी कुटुंबे एकवटले

नंदुरबार : श्रावण मासातील पहिला रविवारी कानुबाई उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे श्रावणातील पहिल्या रविवारी जिल्ह्यात खानदेशचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कानुबाई उत्सवाची धूम सुरू झाली आहे. शनिवारी (ता.३०) सप्त्या पूजनापासून सर्वत्र कानुबाई उत्सवाची व रोट पूजनाची जोरदार तयारी दिसून आली. कानुबाईच्या अहिराणी, मराठीच्या गाण्यांचा तालावर महिला -पुरुषांनी ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. दरम्यान, रविवारी (ता.३१) रोट पूजन व सोमवारी (ता.१) कानुबाई मातेचे विसर्जन होणार आहे. (Latest Marathi News)

खानदेशचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कानुबाई उत्सव नंदुरबार जिल्ह्यात मोठी धूम असते. काही अपवाद वगळता अनेक कुटुंबीयांकडून कानुबाईची स्थापना किंवा रोट पूजनचा कार्यक्रम केला जातो. श्रावण मासातील आज पहिल्या रविवारी अनेकांकडे कानुबाई मातेची स्थापना सायंकाळी करण्यात आली. काही जणांकडे रोट पूजनाचा कार्यक्रम असल्याने नोकरी-व्यवसायानिमित्त वर्षभर बाहेर असलेले भाऊबंदकीतील कुटुंबे गावाकडे परतले आहेत. अहिराणी व मराठी भाषेतील कानुबाईचा गीतांची सर्वत्र धून होती. अस्सल अहिराणी व मराठमोळी चालींवरील या गीतांमुळे अबालवृद्ध ठेका धरून नाचण्याचा आनंद लुटताना दिसले.

हेही वाचा: Shravan 2022 : हर हर महादेव; तिसऱ्या डोळ्याची संकल्पना काय?

शनिवारी रात्री रोट दळणे (गहू दळणे) चा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. डपाचा तालावर गाणे म्हणत जोडी जोडीने जात्यावर गहू दळण्यात आले. रविवारी सायंकाळी सहापासून रोटपूजनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू झाला. पुरण पोळी, खीर आदी नैवेद्य दाखविण्यात आले. त्यानंतर इतर कुटुंबातील भाविकांनी रोट पूजन तसेच दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत मातेचा दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. रात्री भजन-कीर्तनाचा कार्यक्रमांचे आयोजन करीत रात्रभर देवीचे जागरण केले.

आज विसर्जन

कानुबाई मातेचे सोमवारी (ता.१) विसर्जन करण्यात येणार आहे. वाजत -गाजत शहरातील नदीवर देवीचे विसर्जन करीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण भाविकांकडून देण्यात येईल. फुगडी खेळत, एकमेकांचा अंगावर पाणी फेकून हसत-खेळत देवीला निरोप देण्यात येणार आहे.

हेही वाचा: बारा ज्योतिर्लिंग: घृष्णेश्वर मंदिराचा नेमका इतिहास काय आहे ?

Web Title: Shravan 2022 Kanubai Utsav In Khandesh Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top