Shravan 2022 : श्रावण महिन्यात महादेवाला अर्पण करा ‘ही’ आठ फुलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flowers to Lord Mahadeva

Shravan 2022 : श्रावण महिन्यात महादेवाला अर्पण करा ‘ही’ आठ फुलं...

शंभू महादेवाचा (Mahadev) प्रिय महिना म्हणजे श्रावण. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण श्रावणामध्ये (Shravan 2022) त्यांची मनोभावे पूजा करतात. शंभू महादेवाला श्रावणामध्ये जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जर भगवान शंकराला त्यांची आवडती वस्तू अर्पण केली तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तुम्हालाही असे इच्छित फळ मिळवायचे असेल शंकराची आवडती आठ फुले शंकराला मनोभावे अर्पण करावीत.

चला तर मग बघूया कोणती आहेत ती आठ फुले...

हेही वाचा: Shravan somvar: यंदा कधी आणि किती श्रावण सोमवार जाणून घ्या..

1) चमेली फुल : महादेवाला चमेलीचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते. महादेवाच्या कृपेने भक्ताला वाहन सुख मिळते.

2) हरसिंगार फुल : हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख-संपत्ती व समृद्धीचा वास असतो.

3) सारंगी फुल : वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी श्रवणामध्ये महादेवाला सारंगी फूल अर्पण करा. असे मानले जाते की, यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. विवाह जुळण्यात अपयश येत असल्यास यामुळे विवाहयोग जुळून येतो.

4) धोतऱ्याचे फुल : शिवाचा आवडता रंग पांढरा आहे. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे. भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

5) मोगरा फुल : श्रीमंत होण्यासाठी महादेवाला मोगऱ्याचे फूल अर्पण करा. शिवाला शुभ्र मोगरा अर्पण करणे उत्तम. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. तसेच भगवंताला बेला पत्र अर्पण करा.

6) कणेर फुल : कणेरचे फूल शिवासह सर्व देवतांना प्रिय आहे. शिवलिंगावर कणेरचे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडावर कमरेचे फुल वाहावे.

7) जुही फुल : जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धन-धान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही.

8) अळशीचे फुल : अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो.

Web Title: Shravan 2022 Offer These 8 Flowers To Mahadev During The Month Of Shravan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..