Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

नागपंचमी, श्रावण सोमवार, मंगळागौर, रक्षाबंधन, जन्माष्टमी ते पोळ्यापर्यंत श्रावण २०२६ मधील सर्व सण, व्रत आणि महत्त्वाच्या तारखांची संपूर्ण यादी पाहा.
Shravan Festivals Calendar 2026

Shravan Festivals Calendar 2026

sakal

Updated on

बरसणाऱ्या पावसाच्या सरी, अंगणात पसरलेली हिरवाई आणि कानावर पडणारा 'हर हर महादेव'चा गजर अशा अत्यंत पवित्र आणि उत्साही वातावरणात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असलेल्या श्रावण महिन्याला आजपासून (ता. १३) सुरवात होत आहे. हा नांगल्याचा उत्सव ११ सप्टेंबरला श्रावणी अमावास्येला (पोळा) समाप्त होणार आहे. या महिनाभरात देवघरांत पूजा-अर्चा, मंदिरांमध्ये अभिषेक, उपवास-उपासना आणि घराघरांत सणांची लगबग पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com