

swami samrth viral video
esakal
अक्कलकोटचे संत श्री स्वामी समर्थ महाराज हे अवधूत अवस्थेतील दत्तात्रेय अवतार मानले जातात. त्यांच्या लीला अतिशय गूढ आणि रहस्यमयी आहेत. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात स्वामी समर्थ महाराजांच्या भारतभर प्रवासाचा नकाशा दाखवला असून तो “ॐ” या ब्रह्मांडीय नादाच्या आकारात पूर्णपणे बसतो आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @aakash_narayankar यांनी शेअर केला असून लाखो भक्त त्यावर श्रद्धेने प्रतिक्रिया देत आहेत.