‘शिव-पार्वती’च्या वास्तव्याचे श्रीक्षेत्र वडणगे

अं बाबाईच्या वास्तव्याने करवीरनगरीची दक्षिण काशी अशी ओळख आहे. या शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील वडणगे गावात महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणात भरते.
Shri kshetra Wadange the abode of Shiva Parvati
Shri kshetra Wadange the abode of Shiva Parvatisakal

अंबाबाईच्या वास्तव्याने करवीरनगरीची दक्षिण काशी अशी ओळख आहे. या शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील वडणगे गावात महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. करवीर माहात्म्य ग्रंथात उल्लेख असणाऱ्या व भगवान शिव-पार्वतीच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र वडणगे गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावात ३० एकर क्षेत्रात विस्तारलेला शिव-पार्वती तलाव आहे. त्याशेजारी शिव व पार्वती अशी दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. अशी मंदिरे असणारे वडणगे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. महाशिवरात्री दिवशी या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. आसपासच्या खेड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने शिव-पार्वतीच्या दर्शनासाठी दाखल होतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी यात्रेत खंड पडला होता. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने यात्रा पार पडली. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून यात्रा साजरी केली जाणार आहे.

यात्रा काळात महादेव मंदिर व पार्वती मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम व विधी होतील. पहाटे सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते दोन्ही अभिषेक होणार असून, धुपारतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाईल. दोन्ही मंदिरांतून पालखी सोहळा निघेल. पालखी भेट होऊन दुपारी काकडआरती, रात्री भजन होईल. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह स्थानिक व्यवस्थापन समितीने मंदिरातील सर्व कार्यक्रमांचे नियोजन केले असून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कार्यक्रम होतील. सचिन गुरव यांच्याकडे पार्वती मंदिरात, तर नंदकुमार गुरव यांच्याकडे महादेव मंदिरात पूजेचा मान आहे.

कोंबडा या पाळीव पक्ष्याला आपल्याकडे महत्त्व आहे. वडणगे एकमेव गाव असे असावे, की ज्या ठिकाणी कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा होते. करवीरच्या भ्रमणासाठी शिव-पार्वती गावात आले असताना तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला आणि त्यामुळे गावात करवीर काशी झाली, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आहे. कोंबड्यामुळेच वडणगे गावात शिव-पार्वती कायमचे वास्तव्यास राहिले म्हणून या कोंबड्याच्या प्रतिकृतीची महाशिवरात्रीला पूजा केली जाते.

नावलौकिक कमावलेल्या वडणगेतील अग्रगण्य संस्था वडणगे सेवा संस्था

जिल्ह्यातील अग्रेसर संस्था म्हणून ओळख. संस्थेचे दोन हजार १७० सभासद आहेत. भागभांडवल दोन कोटींहून अधिक असून, वार्षिक उलाढाल ८० कोटींवर आहे. ठेवी दोन कोटी ६४ लाखांवर. बँक कर्जे सात कोटी सहा लाखांवर. संस्थेच्या नऊ शाखा असून, लेखापरीक्षण सतत अ वर्ग आहे. पारदर्शी कारभारातून संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्था विजेबाबत स्वयंपूर्ण होईल. लवकरच सौर यंत्रणा बसवली जाणार आहे.

वडणगे दूध संस्था

दूध संकलनात अग्रेसर असणारी दूध संस्था आहे. ५७२ सभासद असलेल्या या संस्थेची वार्षिक उलाढाल एक कोटींवर आहे. संस्थेला जास्तीत जास्त दूध उत्पादन करणाऱ्या गाय व म्हैस दूध उत्पादकांना बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

सर्वाधिक दूध दर फरक देणारी संस्था. सतत ऑडिट वर्ग अ असलेल्या या संस्थेच्या वाटचालीत संस्थापक सदाशिव पाटील-मास्तर व मार्गदर्शक म्हणून बाजीराव पाटील यांचे मोठे योगदान आहे.

शाहू पतसंस्था

मार्केट कमिटी संचालक बी. एच. पाटील संस्थापक अध्यक्ष आहेत. आदर्श पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या या संस्थेची स्थापना १९८८ मध्ये झाली. संस्थेकडे दोन हजार ७१५ सभासद असून, ठेवी १८ कोटी ३१ लाखांवर आहेत. लेखापरीक्षण सतत अ वर्ग आहे. कर्जे आठ कोटी २५ लाखांवर आहे. निधी चार कोटी ९१ लाख असून, भागभांडवल ९५ लाख नऊ हजार आहे.

पंचगंगा पाणीपुरवठा संस्था

योग्य नियोजन करून संस्थेने २७० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. शेतकऱ्यांच्या थेट बांधापर्यंत संस्थेने पाणी पोचविले. संस्थेचे एक हजार १०८ सभासद आहेत. भागभांडवल पाच लाखांवर आहे. संस्थेचा निधी ६३ लाखांवर असून, ठेवी आठ लाखांहून अधिक आहेत. वार्षिक उलाढाल एक कोटी २० लाख आहे. शेतकऱ्यांच्या विश्‍वासाला पात्र ठरलेली संस्था म्हणून परिसरात ओळख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com