

Shukra Gochar 2026 in Libra: Meen & Vrishchik Caution
esakal
Horoscope Shukra Gochar 2026 in Libra: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. सुख, समृद्धी, कला, भौतिक साधने आणि नात्यांतील गोडव्याचा कारक मानला जाणारा शुक्र 22 नोव्हेंबर 2026 ला आपल्या तूळ राशीत परतत आहे. हे गोचर 1 जानेवारी 2027 पर्यंत म्हणजेच सुमारे 40 दिवस कायम राहणार आहे.
शुक्र स्वराशीत येत असल्याने सर्वसाधारणपणे अनेक राशींना लाभ मिळण्याचे संकेत असले तरी, काही राशींच्या व्यक्तींना या काळात खर्चाचा ताळमेळ, नोकरी-व्यवसायातील निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये विशेष दक्षता घेण्याची गरज भासू शकते.