Sita Navami 2023 : सीता नवमीला 'या' राशींना मिळणार सौभाग्याचा आशीर्वाद, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

आज आपण पुजा, मुहूर्त आणि सीता नवमीचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
Sita Navami 2023
Sita Navami 2023sakal

Sita Navami 2023 : पंचांग नुसार, सीता नवमी दर वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते म्हणजेच आज संपुर्ण देशात सीता नवमी साजरी केली जाणार आहे. त्रेता युगात याच तिथी वर देवी सीता भूमितून प्रकट झाली होती.

या दिवशी सीता मातेचे पुजन केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दु:ख नष्ट होणार. आणि विवाहीत महिलांना सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळणार. आज आपण पुजा, मुहूर्त आणि सीता नवमीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. (Sita Navami 2023 these zodiac signs will get blessing know about its puja vidhi and Muhurat )

सीता नवमीचा शुभ मुहूर्त

सीता नवमी तिथी ही 28 एप्रिल 2023 सायंकाळी 04:01 वाजतापासून सुरू झालेली असून 29 एप्रिल 2023 शनिवार, संध्या 06:22 वाजता पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही आज दिवसभर केव्हाही पूजा करू शकता.

Sita Navami 2023
Ram Navmi 2022: पुण्यात साकारली प्रभू श्रीराम अन् बजरंगबलीची झक्कास रांगोळी; पाहा फोटो

सीता नवमीची पूजा विधि

  • सकाळी उठून अंघोळ करावी आणि त्यानंतर घरातील मंदिर स्वच्छ करावे.

  • पूजेनंतर देवी देवतांना गंगाजलनी अभिषेक करावा.

  • जर महिला या दिवशी उपवास ठेवत असेल तर त्यांनी फक्त फळे खावीत.

  • राम सीतेच्या मंदिरात जावे आणि मनोभावे पूजा करावी.

  • सर्व देवतांना फळ, तिळ आणि तांदूळ अर्पण करावे.

  • पूजेनंतर आरती करावी आणि प्रसाद चढवावा.

  • यादिवशी हनुमानजींची विशेष पूजा करावी.

Sita Navami 2023
वडगावात श्रीराम नवमी निमित्त मिरवणूक

सीता नवमीच्या दिवशी या राशींना मिळणार सौभाग्यवतीचा आशीर्वाद

मेष, कर्क, तुळ आणि वृश्चिक राशींच्या महिलांना सीता नवमी शुभ जाणार. सीता नवमीच्या राशींना सौभाग्याचा आशीर्वाद मिळणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com