

Why Certain Plants Attract Snakes to Your Home
esakal
निसर्गाच्या सानिध्यात राहणे कोणाला आवडत नाही? घराभोवती हिरवीगार झाडे लावली की मनाला प्रसन्नता मिळते आणि घराचे सौंदर्यही वाढते. मात्र वृक्षारोपण करताना आपण केवळ सौंदर्याचा विचार करतो, पण त्या झाडांच्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतो. काही विशिष्ट झाडे त्यांच्या गंधामुळे, थंडव्यामुळे किंवा त्यांच्या रचनेमुळे सापांना आकर्षित करतात. साप हे मुळात थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना लपण्यासाठी सुरक्षित आणि थंड जागा हवी असते. जर तुमच्या बागेत किंवा अंगणात काही विशिष्ट वनस्पती असतील, तर तिथे सापांचा वावर वाढण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या घराभोवती कोणती झाडे असावीत आणि कोणती नसावीत याची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.