

Astrology Alert: Sun Moves to Libra on October 17, Precautions for 3 Zodiac Signs
esakal
Sun transit effects on zodiac signs: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व असते. सर्व ग्रहांचा राजा मानल्या जाणाऱ्या सूर्यदेवाच्या हालचालींमधील बदलांचा थेट प्रभाव सर्व १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. पंचांगानुसार, येत्या १७ ऑक्टोबर २०२६ ला सूर्यदेव आपले राशी परिवर्तन करून तूळ राशीत प्रवेश करणार आहेत.
सूर्याच्या या आगामी गोचरामुळे सर्व राशींवर वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतील. पण, ज्योतिषाचार्यांच्या मते, सूर्याचे हे परिवर्तन तीन विशिष्ट राशींच्या लोकांसाठी काही प्रमाणात आव्हानात्मक आणि त्रासदायक ठरू शकते. या काळात नोकरीत अडथळे, व्यवसायात मंदी आणि आर्थिक तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी आणि त्यांच्यासाठी काय आहेत सावधगिरीचे इशारे, हे सविस्तर जाणून घेऊया-