आज खग्रास चंद्रग्रहण; जाणून घ्या कुठे दिसणार |Lunar Eclipse | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lunar Eclipse

आज खग्रास चंद्रग्रहण; जाणून घ्या कुठे दिसणार

खग्रास चंद्रग्रहण -

वैशाख पौर्णिमेस अर्थात रविवार दि.15/16 मे 2022 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतात दृश्यमान होणार नाही.

हे चंद्रग्रहण दक्षिण- पश्चिम युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिका, फ्रान्स, क्युबा, स्पेन, चिले, न्यूयॉर्क, शिकागो, कॅलिफोर्निया, मेक्सिको, पोर्तुगाल, इटली या प्रदेशात खग्रास स्वरूपात दृश्यमान होणार आहे.

हेही वाचा: Reels बनवायला आवडतं? कमवा महिन्याचे तीन लाख, Facebook ची मोठी घोषणा

  • टर्की, इजिप्त, हंगेरी, ग्रीस या ठिकाणी हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दृश्यमान होईल.

  • लंडन, पॅरिस येथे हे चंद्रग्रहण ग्रस्तास्त स्वरूपात दिसणार आहे.

  • लॅास एंजल्स येथे हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरूपात दृश्यमान होईल.

  • न्यूयॉर्क येथील ग्रहणाचे गणित केल्यास चंद्रबिंब ग्रासमान १६ अंगुल ५५ व्यंगुल इतके येत आहे.

ग्रहण दिसणाऱ्या भारताबाहेरील काही प्रमुख शहरांच्या स्पर्श व मोक्ष वेळा पुढीलप्रमाणे-

  • न्यूयॉर्क स्पर्श-22:27 EDT, मोक्ष-01:55 EDT

  • लंडन स्पर्श- 03:28 BST, मोक्ष- 05:07 BST

  • पॅरिस स्पर्श- 04:28 CEST, मोक्ष- 06:10 CEST

  • शिकागो स्पर्श- 21:28 CDT, मोक्ष- 00:55 CDT

  • लॅास एंजल्स स्पर्श- 19:40 PDT, मोक्ष- 22:55 PDT

हेही वाचा: WhatsApp Features : व्हॉट्सॲपकडून ‘यूजर फ्रेंडली’ फीचर्स!

भारतीय प्रमाणवेळेनुसार या ग्रहणाचा स्पर्श 16 मे 2022 च्या सकाळी 07:58 वाजता असून ग्रहणमोक्ष सकाळी 11:25 वाजता आहे.

भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम भारतातील लोकांनी पाळू नयेत तसेच या ग्रहणाचे नैसर्गिक व राशी इत्यादीनुसार होणारे परिणाम ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशात विचारात घेऊ नयेत.

तसेच ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशातील व भारतातील गर्भवती स्त्रियांनी देखील या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: The First Lunar Eclipse Will Be Visible Over The Weekend In Several Parts Of The World Check Here Time And Place

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top