

Marathi Rashi Bhavishya : उद्या रविवारी 1 फेब्रुवारी असून माघ मासातील पौर्णिमा आहे. उद्याच्या दिवसाचे स्वामी सूर्यदेव असतील. उद्या सूर्याचं गोचर मकर राशीत असेल तर शुक्र ग्रहाचं बाल्यत्व संपणार आहे. चंद्राचं भ्रमण कर्क राशीत होते. यामुळे चंद्रावर सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध ग्रहाची सप्तम दृष्टी असेल. यामुळे धनलक्ष्मी बरोबर चंद्राधि योग बनले आहेत. याशिवाय उद्या पुष्य नक्षत्राशी संबंध आल्यामुळे रवी पुष्य योगाची निर्मिती होतेय.