Ukadiche Modak Recipe: माघी गणेश जयंती स्पेशल बनवा उकडीचे परफेक्ट मोदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukadiche Modak

Ukadiche Modak Recipe: माघी गणेश जयंती स्पेशल बनवा उकडीचे परफेक्ट मोदक

Maghi Ganesh Jayanti: आज माघी गणेश जयंतीनिमित्त घरोघरी गणराय विराजमान झाले आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो. आजच्या लेखात आपण माघी गणेश जयंतीनिमित्त घरच्य घरी बेस्ट उकडीचे मोदक तयार होऊ शकतात.

साहित्य

● दोन वाटी तांदळाचे पीठ 

● दोन कप किसलेले नारळ 

● एक कप गूळ  

● तूप वेलची पावडर 

● मीठ 

कृती:

उकडीचे मोदक तयार करण्यासाठी  सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात दोन वाट्या खोबरे घालून परतून घ्या.खोबऱ्याचा सुगंध यायला लागल्यावर त्यात बारीक केलाला गूळ टाका आणि नीट मिक्स करून शिजवा.मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत आणि नारळात मिसळेपर्यंत शिजवा. ते मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, नंतर वेलची पावडर घाला. मोदकाचे सारण तयार आहे.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

आता दुसरे कढई घेऊन त्यात एक चमचा तूप घालून मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळले की त्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि मिसळा. आता त्यात दोन वाटी पाणी टाकून उकळा. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करा. तांदळाचे पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत ते मिक्स करावे.आता गॅस बंद करून पीठ झाकून पाच मिनिटे बाजूला ठेवा. पीठ थोडे कोमट राहिल्यावर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा आणि नंतर पीठ मळून घ्यावे.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी दुधी भोपळ्याची खिर कशी तयार करायची?

पीठ पूर्णपणे मऊ होईपर्यंत मळून घ्या. आता मोदकासाठी पीठ तयार आहे.आता पिठाचे गोळे बनवा आणि एक गोळा घ्या, त्याचे गोल करा आणि नंतर ते चपटे करा. यानंतर, दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी हलके दाबा. कपाचा आकार येईपर्यंत पीठाचे कोपरे हळू हळू दाबत रहा. मग त्यातून प्लीट्स बनवा. यानंतर मोदकात तयार गूळ-खोबऱ्याचे सारण चमच्याच्या साहाय्याने भरून प्लीट्स गोळा करून वरून दाबून बिंदूचा आकार द्यावा.अशाप्रकारे सगळे मोदक बनवून घ्या आणि त्यांना नंतर 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या. चविष्ट उकडीचे मोदक तयार आहेत.