Unlucky Things : सकाळी उठून या 5 गोष्टी चुकूनही बघू नये, मानल्या जातात अशुभ

सकाळी काही गोष्टी बघणे टाळावे. तेव्हा या कुठल्या गोष्टी आहेत ते आज आपण जाणून घेऊया.
Unlucky Things
Unlucky Thingsesakal

Unlucky Things : वयोवृद्ध लोकांकडून आपण सतत काहीना काही ऐकत असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत नाही तर भाग्याचीही महत्वाची भूमिका असते. त्यासाठी ते कायम वास्तू शास्त्रआधारित उपयांबाबत सांगत असतात. त्यातीलच एक उपाय म्हणजे सकाळी काही गोष्टी बघणे टाळावे. तेव्हा या कुठल्या गोष्टी आहेत ते आज आपण जाणून घेऊया.

वास्तु शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर लगेच चुकूनही आपण चुकून 5 गोष्टी पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस व्यर्थ जाऊ शकतो.

तुटलेली मूर्ती

वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, देव-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही घरात ठेवू नयेत. कोणतीही मूर्ती तुटली असेल तर ती कपड्यात गुंडाळून पूजा स्थळाशिवाय कुठेतरी सुरक्षित ठेवावी. सकाळी उठल्यावर चुकूनही ती खंडित मूर्ती दिसू नये याची काळजी घ्यावी. असे केल्याने जीवनात अडचणी वाढतात.

Unlucky Things
Unlucky Things

सकाळी आरशात पाहू नका

ज्योतिषांच्या मते, सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नये असे करणे मनातील अहंकार वाढण्याचे लक्षण आहे. त्याचबरोबर त्यापुढची कामेही बिघडू शकतात. म्हणूनच सकाळी उठल्यावर आरशात न बघता सर्वप्रथम पूजागृहात जाऊन देवाचे दर्शन घ्या.

स्वयंपाकघरातील उष्टी भांडी

वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की रात्री झोपताना भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. असे केल्याने माता लक्ष्मी दुःखी होते. सकाळी उठल्यावर माणसाची पहिली नजर उष्ट्या भांड्यावर पडली तर त्याचा संपूर्ण दिवस खराब होतो. पती-पत्नीच्या नात्यावरही याचा परिणाम होतो आणि घरातील वातावरण बिघडते. (morning)

Unlucky Things
Kitchen Astro Tips : स्वयंपाक घरातल्या तव्याचे हे छोटेसे उपाय करतील घरातले सगळे तणाव दूर...

स्वत:ची सावली बघू नये

वास्तु नियमांनुसार, सकाळी उठल्याबरोबर तुमची सावली पाहणे अशुभ मानले जाते. हे जीवनातील अंधार, एखाद्याचा मृत्यू किंवा घरगुती कलहाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर ही सवय लगेच सोडा. असे न केल्यास त्या व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. (Astrology)

Unlucky Things
Kitchen Astro Tips: किचनमध्ये देवघर बनवणं योग्य आहे का? काय आहेत त्यांचे नियम

बंद घड्याळ घरात ठेवू नका

जर धार्मिक विद्वानांना सकाळी डोळे उघडल्यानंतरच त्यांच्यासमोर बंद घड्याळ दिसले तर हे वाईट काळाचे लक्षण मानले जाते. असे मानले जाते की तुमच्या आयुष्यात मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी घड्याळ खराब होताच त्याची तातडीने दुरुस्ती करावी. नाहीतर घड्याळ काढून ठेवावे.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com