Vaikuntha Chaturdashi 2022 : वैकुंठ चतुर्दशीला 'या' कथा वाचल्याने मिळते १४ हजार पापांपासून मुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaikuntha Chaturdashi 2022

Vaikuntha Chaturdashi 2022 : वैकुंठ चतुर्दशीला 'या' कथा वाचल्याने मिळते १४ हजार पापांपासून मुक्ती

Vaikuntha Chaturdashi 2022 : हिंदू संस्कृतीनुसार कोणताही मुहूर्त हा सुर्योदयानुसार गृहित धरला जातो. त्यामुळेच काल ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.२८ ला वैकुंठ चतुर्दशीला सुरूवात झाली. तर आज सायंकाळी ४ वाजून १५ मिनीटांपर्यंत मुहूर्त असणार आहे.

या काळात पुराणातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या तीन कथा वाचाव्या असं सांगितलं जातं. ज्याविषयी सांगितलं जातं की, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी यांचं वाचन केल्यावर १४ हजार पापांचे कर्म दोष दूर होतात. या कथा तुमच्यासाठी इथे देत आहोत.

हेही वाचा: Vaikuntha Chaturdashi 2022: वैकुंठ चतुर्दशी पुजा विधी महत्व आणि कथा

कथा १

एकदा नारद मुनी पृथ्वीलोक फिरून वैकुंठात जातात तिथे विष्णूदेव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचं कारण विचारतात. त्यावर नारद मुनी म्हणतात, हे देवा जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते तरतात. पण सामान्य लोकांचं काय? त्यांच्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा.

हेही वाचा: Tripurari Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमेला का म्हणतात त्रिपुरारी पाहुया काय आहे त्या मागची पौराणिक कथा

यावर विष्णूदेव सांगतात, कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रताचं पालन करेल आणि श्रध्दा, भक्तीने पूजा अर्चना करेल त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं खुली होतील. या नंतर श्री विष्णूंनी जर विजयला बोलावून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाची दारं खुली ठेवण्याचा आदेश दिला. या दिवशी जो पण विष्णू देवाची पूजा नामःस्मरण करेल त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल असं विष्णूंनी सांगितलं.

हेही वाचा: Kartik Ekadashi 2022 : कार्तिक एकादशी पूजा कशी करावी? जाणून घ्या कोणत्या मंत्राचा करावा जप

कथा २

पौराणिक कथेनुसार एकदा श्री विष्णू महादेवाची पूजा करण्यासाठी काशीला आले होते. तिथं मनकर्णिका घाटावर आंघोळ करून त्यांनी एक हजार स्वर्ण कमळ फुलांनी भगवान विश्वनाथाच्या पूजनाचा संकल्प केला. अभिषेकानंतर जेंव्हा ते पूजा करू लागले तर त्यांची परिक्षा घेण्यासाठी महादेवाने त्यांचं एक फूल कमी केलं. श्री विष्णूंना पूजा पूर्तीसाठी हजार फुलं वाहायची होती. एक फूल कमी असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी विचार केला मला कमलनयन, पुंडरीकाक्ष म्हणतात. म्हणजे माझे डोळेपण कमळासमान आहे. मग आता तेच मी अर्पण करतो.

हेही वाचा: Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या

त्यांची भक्ती बघून महादेव प्रट झाले. ते म्हणाले, हे विष्णू या जगात माझा तुझ्यासारखा दुसरा भक्त नाही. आजची ही कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जो पहिले भागवान विष्णूची पूजा करेल त्याला वैकुंठ लोक प्राप्त होईल.

हेही वाचा: कार्तिक एकादशी सोहळा उत्साहात

या वैकुंठ चतुर्दशीला शिवाने कोटी सुर्यप्रकाश असणारं सुदर्शन चक्र विष्णूंना प्रदान केलं. या दिवशी स्वर्गाची दारं खुली राहतील. जो हे व्रत मनापासून करेल त्याला वैकुंठधाम मिळेल.

कथा ३

धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता. तो फार वाईट वागायचा, अनेक पापं केली होती. एकदा तो गोदावरी नदीवर आंघोळीला गेला. त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते. त्यांच्यासोबत धनेश्वरही होता. ही वैकुंठ चतुर्दशी होती. या श्रध्दाळू लोकांमुळे धनेश्वरलापण पुण्य मिळालं. त्याचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नकरात टाकलं.

तेंव्हा श्री विष्णू तिथं आले आणि म्हणाले, याने खूप पापं केली आहेत. पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केलं. आणि तिथं आलेल्या अनेक श्रध्दाळूंच्या पुण्याने त्याचेपण सर्व पाप नष्ट झाले आहेत. आता त्याला वैकुंठ धाम मिळेल.

टॅग्स :culture