Valmiki Ramayana : रामायणात लक्ष्मण रेषा खरंच ओढली होती का? वाल्मिकी रामायणात उल्लेखच नाही, तज्ज्ञ सांगतात...

संपूर्ण रामायणाची सुरूवात ती एक रेषा ओलंडल्याने झाली असे मानले जाते. पण ती खरंच होती का?
Valmiki Ramayana
Valmiki Ramayanaesakal

Lakshman Rekha Not Mentioned : सर्वांनाच रामायणाची ही कथा माहित आहे की, सीतेला सुवर्ण मृग आवडले आणि ते आणायला गेलेल्या श्रीरामांच्या मदतीला लक्ष्मण धावले अन् त्या आधी सीता मातेच्या संरक्षणासाठी लक्ष्मण रेषा ओढून गेले. असे म्हटले जाते की, सीतेने ती रेषा पार केली नसती तर पुढचं रामायण घडलंच नसतं.

पण ही रेषा खरंच ओढली गेली होती का? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. यामागे काय आहे लॉजिक समजून घेऊया.

तुलसीदासांच्या रामचरीतमानस आणि वाल्मिकी रामायणात अशा कोणत्याही प्रकारचा संदर्भ आढळत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विविध रामायणांच्या यादीमध्ये वाल्मिकी रामायणाला सर्वात प्रमाण आणि सिद्ध रामायण समजले जाते. त्यानंतर दुसरा क्रमांत तुलसीदासांच्या रामचरित मानसाचा येतो. या दोन्हीत लक्ष्मण रेषेचा उल्लेख नसल्याने अशी घटना घडली होती का? असाही प्रश्न उपस्थित केला जातो.

Valmiki Ramayana
Ramayan Serial : कोल्हापूरच्या आखाड्यात सुग्रीवचा शोध ते ७५ रुपयातले स्पेशल इफेक्टस ! जादू रामायणाची..

लक्ष्मण रेषेची प्रसिद्ध कथा

सीतेने हट्ट धरला म्हणून राम त्या सुवर्ण मृगाच्या शिकारीला निघतात. मारिच नावाचा राक्षस त्या मृगाचं रुप घेऊन आलेला असतो. त्याला रामांचा बाण लागताच तो राक्षस श्रीरामांच्या आवाजात लक्ष्मणाला आवाज देतो. तो आवाज ऐकून राम संकटात आहेत असे समजून सीता लक्ष्मणाला त्यांच्या मदतीला जा म्हणून सांगते.

त्यावेळी सीता मातेला एकटं सोडून कसं जाणारा या चिंतेत लक्ष्मणाने एक रेषा त्यांच्या कुटी बाहेर ओढली. ज्यामुळे कोणीही ती रेषा ओलांडून मातेपर्यंत पोहचू शकणार नाही. पण साधू वेशात आलेल्या रावणाला भीक्षा घालण्यासाठी सीता ती रेषा ओलांडते आणि रावण तिला पळवून नेतो अशी कथा सांगितली जाते.

Valmiki Ramayana
Ramayan Movie: आता आलीया - रणबीर होणार राम - सीता, तर रावण.. नितेश तिवारीचा रामायणावर नवा सिनेमा

रामचरित मानसमध्ये काय आहे?

रामचरित मानसमध्ये याचा थेट उल्लेख नाही. पण त्याच्या लंकाकांडात रावणाची पत्नी मंदोदरी हिने याचा उल्लेख केल्याचं आढळतं.

वाल्मिकी रामायणात काय?

या घटनेचे वाल्मिकी रामायणातील आरण्यक कांडातील पंचचत्वारिंसा सर्गात तपशीलवार वर्णन केले आहे. त्यात म्हटले आहे की सीता रागावलेली असताना लक्ष्मण आपल्या मोठ्या भावाच्या शोधात निघाले. वाल्मिकी रायमायणात कुठेही असे लिहिलेले नाही की, लक्ष्मणाने निघताना संरक्षण रेषा काढली. कुटीमध्ये सीती एकटी असल्याचे पाहून रावण संन्यासीच्या वेशात तेथे पोहचला.

भीक्षू म्हणून आलेल्या रावणाला सीता बसण्यासाठी आसन देते. मग पाय धुवायला पाणी. जेव्हा ती साधूला परिचय विचारते तेव्हा तो म्हणतो, हे सीता, ज्याच्या भीतीने देव, दानव आणि मानवासह तिन्ही लोकांचा थरकाप उडतो तो मी राक्षसांचा राजा रावण आहे.

याला पुष्टी देणारा राधावल्लभ त्रिपाठी यांचा एक व्हिडीओ यूट्यूबवर आहे. तुम्ही बघू शकतात.

शास्त्र काय सांगते?

शास्त्रानुसार अभिमंत्रीत रेषा काढण्याची विद्या लक्ष्मणाला अवगत होती. ज्याला आपण लक्ष्मण रेषा म्हणतो तिचे नाव सोमना कृतिक यंत्र आहे. हे भारतातील प्राचीन विद्यांपैकी एक असून याचा शेवटचा उपयोग महाभारताच्या युद्धात झाला होता असं तज्ज्ञ सांगतात.

लक्ष्मण रेषेविषयीची मान्यता

जी रेषा ओढली ती अभिमंत्रीत रेषा होती असे सांगितले जाते. हा वेदमंत्र आहे. जो सोमना कृतिक यंत्राशी संबंधित आहे. ऋंगी ऋफीच्या हवाल्याने पुराणात लिहिले आहे की, लक्ष्मणाला ही विद्या अवगत होती. नंतर ही विद्या लक्ष्मण रेषा म्हणून ओळखली गेली. महर्षी दधिची आणि महर्षी शांडिल्यांनाही हे ज्ञान होते.

Valmiki Ramayana
Ramayan : अरुण गोवील, दीपिका चिखलिया पुन्हा दिसणार राम-सीतेच्या भूमिकेत

लक्ष्मण रेषेचा आजचा अर्थ

ती रेषा मर्यादेची होती. कोणीही इतर ती आखू शकत नाही. तर प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मर्यादेची रेषा ओळखून रहावे, नाहीतर रामायण घडते असे या राधावल्लभ त्रिपाठी यांच्या व्हिडीओतून समोर येते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com