Vastu Tips : या वस्तू हातून पडणे मानले जाते अशुभ, देतात आर्थिक संकटाचे संकेत...

वास्तुशास्त्रानुसार या काही वस्तूंचे हातून पडणे काहीतरी अशुभ घडणार असल्याचे दर्शवतात
Vastu Tips
Vastu Tipsesakal

Vastu Tips : अनेकदा घाईघाईत आपल्या हातून बऱ्याच वस्तू पडतात. हे खरं तर फार सामान्य आहे. मात्र हातून काही गोष्टी पडणे हे संकटांना आमंत्रण ठरू शकतं. तेव्हा या गोष्टीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. वास्तुशास्त्रानुसार या काही वस्तूंचे हातून पडणे काहीतरी अशुभ घडणार असल्याचे दर्शवतात. चला तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याचे पडणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले गेले आहे ते जाणून घेऊया.

मीठ

जीवनात मीठाचं फार महत्व आहे. मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर त्याचा नशिबाशीही खोलवर संबंध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतिनिधी मानले जाते. म्हणूनच असं म्हणतात की हातातून मीठ पडलं तर ते अशुभ लक्षण आहे. म्हणजे आयुष्यात संकटे येणार आहेत.

Vastu Tips
Astrology : अच्छे दिन येण्याआधी तुम्हाला मिळतात हे 7 संकेत, श्रीमंतीचे द्वार आपोआप उघडेल

दूध

दूध हा चंद्राचा कारक आहे. गॅसवर ठेवलेले दूध उकळले आणि सांडले किंवा दुधाचा ग्लास हातातून पडला तर ते चांगले मानले जात नाही. असे म्हटले जाते की दुधाची गळती आर्थिक संकट दर्शवते.

Vastu Tips
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा? जाणून घ्या

काळी मिरी

काळी मिरी हाताने विखुरणे हे अशुभ लक्षण मानले जाते. हातातून काळी मिरी पडली आणि विखुरली तर नात्यात दुरावा येतो, असं म्हणतात. हातातून काळी मिरी पडल्याने नकारात्मकता वाढते. (Vastu Tips)

अन्न

अन्न खाताना किंवा सर्व्ह करताना ते पडणे अशुभ आहे असे म्हणतात. जेवण देताना हातातून अन्नपदार्थ पडल्यास अन्नपूर्णा देवी मां लक्ष्मीचा अपमान होतो. हे घरातील गरिबी दर्शवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com