World Sleep Day : 'या' माणसाच्या नावे आहे सर्वाधिक झोपण्याचं रेकॉर्ड, तब्बल l World Sleep Day Sleep Record wyatt show sleeping habit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Sleep Day

World Sleep Day : 'या' माणसाच्या नावे आहे सर्वाधिक झोपण्याचं रेकॉर्ड, तब्बल...

Sleep Record : एक आरोग्यपूर्ण जीवनासाठी जेवढं हेल्दी फूड आवश्यक आहे तेवढीच. योग्य झोप घेणंही आवश्यक आहे. दिवसभराचे थकलेलो आपण रात्री शांत झोप घेतो. पण हल्लीच्या तणाव पुर्ण आणि बिघडलेल्या लाइफस्टाईलमुळे लोकांना झोपेसंदर्भात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच लोकांना झोपेचे महत्व समजण्यासाठी मार्च महिन्यातल्या तिसऱ्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय स्लीप डे साजरा करण्यात येतो.

स्लीप डे चा इतिहास

झोपेच्या कमतरतेने माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. झोपेशी निगडीत समस्यांपासून वाचण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने स्लीप डे ची सुरुवात केली. २००८ मध्ये सर्वात पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. सध्या जगभरातल्या ८८ देशांमध्ये वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो.

सर्वाधिक झोपण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड

तज्ज्ञ सांगतात की, कोणाचा झोपेचा काळ मोजणं फार कठीण असतं. सर्वाधिक झोपल्याचं रेकॉर्ड करूनही मतभेद असूच शकतात. कारण काही लोक ठरावीक स्थितीत बऱ्याचवेळ झोपू शकतात. पण इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार जाणून घेऊया सर्वाधिक झोपण्याचं रेकॉर्ड कोणी केलं आहे.

ऑक्टोबर २०१७ मध्ये केंटकीत ७ वर्षाचा वायट शॉ (Wyatt Shaw)११ दिवस झोपला होता. जेव्हा दुसऱ्या दिवशी तो उठला नाही तेव्हा त्याची आई त्याला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी त्याच्या टेस्ट केल्या. सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत होते. अजून १० दिवस झोपल्यानंतर शॉ ला जाग आली. १३ दिवस त्याला दवाखान्यातच ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे अजूनही सर्वाधिक काळ झोपल्याचं रेकॉर्ड अजूनही वायट शॉच्या नावे आहे.

टॅग्स :Sleep