Vastu Tips:आर्थिक संकटात आहात? देव्हाऱ्यात 'या' वस्तू ठेवाच!

वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी देव्हाऱ्यात ठेवल्याने सुख-समृद्धी आणि धनवृद्धी होते. तसंच लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो.
Devghar (Temple in the house)
Devghar (Temple in the house)Sakal

देव्हारा हे घरातलं सर्वात पवित्र स्थान मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये पूजाअर्चेला विशेष महत्त्व आहे. या पूजेसाठी काही वस्तूंना शुभ मानलं गेलं आहे. या वस्तू घरात ठेवल्याने घरातलं वातावरण सकारात्मक राहतं, शिवाय समृद्धी आणि भरभराटीचे मार्गही मोकळे होतात, अशी मान्यता आहे. जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं.... (Vastu Tips)

Devghar (Temple in the house)
Vastu Tips: वास्तू दोष दूर करायचे सोपे उपाय, सोबतच तुमच्या घरात असणारे दिशा दोष होतील झटपट दूर..

वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी देव्हाऱ्यात ठेवल्याने सुख-समृद्धी आणि धनवृद्धी होते. तसंच लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो.

घंटी

ज्या घरात नियमितपणे घंटीचा आवाज येतो तिथे सकारात्मकता राहते, असं मानलं जातं. म्हणून पूजा करताना घंटी वाजवली जाते.

मोरपंख

भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटावर मोरपंख लावलेला असतो. त्यामुळे काही जण मोरपंख घरात ठेवतात. मोरपंखामुळे संपत्तीत वाढ होऊन, घरात सुखशांती नांदते.

Devghar (Temple in the house)
Vastu Tips: तुमच्या घरातील अनेक वास्तूदोष दूर करण्याच काम करते तुरटी...

शंख

देव्हाऱ्यात शंख ठेवणंही शुभ मानलं जातं. पूजेनंतर शंखनाद केल्याने घरात सुख-समृद्धी आणि धनधान्य राहतं, अशी मान्यता आहे.

कलश

देव्हाऱ्यात रोजच्या रोज पाण्याने भरलेला कलश ठेवणं हे अनेक घरात दिनचर्येचा भाग आहे. गणपतीला कलश प्रिय आहे. त्यामुळे हा कलश ठेवला जातो.

Devghar (Temple in the house)
Vastu Tips: तुमच्या घरात 'या' 4 गोष्टी निट ठेवा; तुम्ही आपोआप व्हाल मालामाल..

गंगाजल

गंगाजल पितळ किंवा चांदीच्या पात्रात भरुन ठेवलं जातं. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. घरातल्या संपत्तीतही वाढ होते.

शाळीग्राम

शाळीग्राम भगवान विष्णूचं रुप मानलं जातं. त्यामुळे तुळशीच्या पानांसोबत शाळीग्रामची पूजा केली जाते. यामुळे घरात सुख समृद्धी राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com