Vastu Tips : घरातला चुकीच्या जागेवरचा टीव्ही पटकन उचला; त्याआधी कारण वाचा

टीव्ही दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ
Vastu Tips
Vastu Tips esakal

पुणे : आधुनिक युगातही लोक घर बांधताना वास्तूचे सर्व नियम पाळतात. घराची वास्तू बरोबर नसेल तर घरात नकारात्मकता वाढते. आणि वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. घरामध्ये असलेल्या वस्तू, खिडकी, स्वयंपाकघर, बाथरूम, अगदी घरातील झाडेही योग्य दिशेने असणे खूप महत्वाचे आहे. याबरोबरच घरात असणारा टीव्ही योग्य दिशेला आहे का?, हे पाहणेही आवश्यक आहे. इंदूरमधील ज्योतिष आणि वास्तू विषारद कृष्ण कांत शर्मा यांनी याबद्दल काही टिप्स दिल्या आहेत.

Vastu Tips
Vastu Tips : आर्थिक त्रासाला कंटाळले आहात? शनिवारी सुपारीचे 'हे' सोपे उपाय करा

या दिशेला असावा टीव्ही

घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्याची योग्य दिशा वास्तुशास्त्रामध्ये सांगितली आहे. टीव्हीसाठी दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ असल्याचे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. तसेच टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दक्षिण दिशेला असावा असे सांगण्यात आले आहे. असे केल्याने घराच्या हॉलमध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढते. परिणामी घरात शांतता राहते.

Vastu Tips
Vastu Tips: शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे? या वास्तू टिप्सचा अवलंब करा

बेडरूममध्ये टीव्ही नको

अनेकांना रात्री झोपताना टीव्ही पाहणे आवडते. त्यामुळे ते बेडरूममध्ये टीव्ही लावतात. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे वास्तूशास्त्र सांगते. रात्रभर टीव्ही पाहिल्यावर झोप तर पूर्ण होत नाहीच पण आरोग्यही बिघडते. त्यामुळे बेडरूममध्ये टीव्ही लावू नये, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.

Vastu Tips
Dasara Vastu Tips 2022 : आज घरामध्ये हा किडा दिसला तर समजून घ्या ,नशीब बदलणार आहे

हे लक्षात ठेवा

घरात प्रवेश करताना समोर दिसेल अशा जागी टीव्ही ठेऊ नका. हे वास्तूशास्त्राच्या नियमात बसत नाही. यामुळे घरामध्ये नेगेटीव्ह एनर्जीचा वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com