

Vastu Shastra Tips: How 1 Peacock Feather Can Change Your Home's Energy
esakal
Peacock Feather Remedies for Home: वास्तूशास्त्रामध्ये मोरपिसाला अत्यंत पवित्र, ऊर्जादायी आणि शुभ मानले गेले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावर विराजमान असलेले मोरपीस फक्त सौंदर्याचे प्रतीक नसून नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे एक प्रभावी साधन मानले जाते.
वास्तूशास्त्रानुसार, घरात किंवा कार्यस्थळावर योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी मोरपीस ठेवल्याने राहु-केतू यांसारख्या ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात, वास्तू दोष दूर होतात आणि कुटुंबात आनंद, शांतता व समृद्धी नांदते. वास्तू नियमांनुसार घरामध्ये कोणकोणत्या ४ महत्त्वाच्या ठिकाणी मोरपीस ठेवल्याने विशेष शुभ परिणाम मिळतात, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.