Vastu Tips: कबुतरांचे घरात येणं शुभ की अशुभ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips

Vastu Tips : कबुतरांचे घरात येणं शुभ की अशुभ?

पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये अनेकांची जवळजवळ तक्रार असते की आमच्याकडे सतत कबुतर येत असतात; काही लोकांना ते खूप घाण करतात म्हणून तर काहींना त्यांचा सतत येणारा आवाज यामुळे नकोसे होतात; तर काही ठिकाणी हे खूप उलट आहे की लोक कबुतर पाळतात त्यांना धान्य खायला घालतात.वास्तुशास्त्रात कबुतराला लक्ष्मी देवीचा भक्त म्हटले आहे. खरतर काहींना वाचायला हे आश्चर्य वाटेल पण कबुतर हे घरातील सुख-शांतीचे प्रतीक आहे असेही काही लोकांचे मत आहे. पण काही लोकांच्या मते घरात कबुतर असणे अशुभ आहे.

वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अनेकदा लोक अनेक प्रकारचे वास्तु उपाय करतात. आजकाल लोकांच्या घरात पाळीव प्राणी आणि पक्षी दिसतात. वास्तूशास्त्रानुसार, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. तसाच प्रभाव आपल्या घरात पाळलेले प्राणी आणि पक्षी देखील करतात. पण जर कबुतर जर तुमच्या घरी वारंवार येत असतील तर त्याचे वास्तूशास्त्रात वेगळे महत्त्व आहे.

घरामध्ये कबुतराचे घरटे असणे अशुभ मानले जाते?

वास्तुशास्त्रानुसार कबूतर लक्ष्मीचा भक्त असल्याचे सांगितले जाते. कबुतर हे घरातील सुख-शांतीचे प्रतीक मानले जाते. घरांमध्ये कबुतरांची ये-जा अनेकांकडे सुरू असते. मुंबई पुण्यासारख्या शहरात तर हे हमखास दिसते.

वास्तुशास्त्रानुसार घरात कबूतर असणे शुभ मानले जाते. हे सुख आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. पण जर तुमच्या घरात कबुतराने घरटे बनवले तर ते वास्तूशास्त्रानुसार अशुभ आहे. हा एका प्रकारचा संकेत आहे की तुमच्या घरात गरिबी येणार आहे. घरात कबुतराचे घरटे असल्यास आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. त्यामुळे घरात कबुतराचे घरटे कधीही नसावेत आणि ते बांधूही देऊ नयेत.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कबुतराचे घरटे बांधणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात गरिबी येते आणि पैशाचा ओघ थांबतो. तसेच घरातील लोकांसाठी अशुभ घडते. तुमच्या घरातही कबुतराने घरटे बनवले असेल तर ते लगेच काढून टाका. कारण त्यामुळे घरात समस्या निर्माण होतात. यासोबतच प्रगतीचे मार्गही बंद झाले आहेत.

कबुतराशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

- लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कबुतरांना धान्य खाऊ घालावे असे लोक म्हणतात. जर कबूतर तुमच्या घरी येत असतील तर त्यांना गव्हाचे दाणे खायला द्या. त्यामुळे तुमच्या जीवनात आणि घरात सकारात्मक बदल जाणवेल.

- त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवण्याऐवजी अंगणात कबुतर ठेवावे. याने तुमच्या घरातील वास्तुदोष कमी होईल.

- वास्तूशास्त्रानुसार कबुतरांना खायला दिल्याने घरातील लोकांची लग्न आणि प्रेमविवाहाची समस्या दूर होते.

- जर तुमच्या डोक्यावरून कबूतर उडत असेल तर ते लवकरच जीवनातील सर्व समस्या दूर करेल.