
Full Story of Satyavan and Savitri for Vat Savitri Vrat: दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात वट पौर्णिमा साजरी केली जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का, हा सण एकाच महिन्यात एकदा नाही तर दोनदा साजरा केला जातो? भारतात अनेक ठिकाणी पतिव्रतेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतात. आपल्या देशातील इतर विविधतेसोबतच यातही विविधता पाहायला मिळते.
महाराष्ट्रात जसे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वट पौर्णिमा असते तसेच उत्तर भारतातही वट सावित्री व्रताची प्रथा आहे. हे दोनीही एकसारखे सण एकाच महिन्यात साजरे केले जातात.
महाराष्ट्रात हा सण पौर्णिमेला तर उत्तर भारतात हा सण अमावस्येला साजरा केला जातो. परंतु या दोन्हीसाठी एकच व्रत कथा वाचली जाते, ती म्हणजे सत्यवान सावित्रीची.
यंदा महाराष्ट्रात वट पौर्णिमा १० जून रोजी साजरी केली जाईल तर उत्तर भारतात आज म्हणजेच २६ मे ला सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही व्रत कथा.
फार वर्षापूर्वी भद्रदेश नावाच्या राज्यात अश्वपत नावाचा राजा आणि त्याची राणी मालवती राहत होते. त्यांना एक सुंदर आणि तेजस्वी कन्या होती, जिने नाव सावित्री असे होते. सावित्री लहानपणापासूनच खूप बुद्धिमान, धर्मप्रिय आणि सुंदर होती. जेव्हा सावित्री विवाह योग्य वयाची झाला तेव्हा राजाने तिला स्वतःसाठी वर निवडण्याची मुभा दिली.
तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराला आपला वर म्हणून निवड केली. सत्यवान हा वनवासी राजा द्युमत्सेनचा मुलगा होता, जो काही कारणामुळे आपले राज्य गमावून सहकुटुंब जंगलात राहत होता. पण एक गोष्ट होती जी सर्वांनाच चिंतित करत होती, ती म्हणजे एका भविष्यवाणीनुसार सत्यवानाचा मृत्यु एका वर्षाच्या आतच होणार होता. पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि सत्यवानाशी लग्न केले.
सावित्रीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसह आणि सासू-सासऱ्यांसोबत जंगलात राहायला लागली. ती सगळ्यांची मनापासून सेवा करत होती. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता, त्या दिवशी सावित्रीने उपवास केला आणि वटवृक्षाखाली बसून पूजा केली. सत्यवान जेव्हा लाकूड आणायला जंगलात गेला, तेव्हा सावित्रीही त्याच्यासोबत गेली. काही वेळानंतर सत्यवानच्या डोक्यात खूप वेदना होऊ लागल्या आणि तो सावित्रीच्या मांडीवर विसावला. तेव्हाच यमराज, मृत्यूचे देव, त्याचा प्राण घेण्यासाठी आले.
सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला आणि त्यांना विनंती केली की त्यांनी सत्यवानाची आत्मा परत द्यावी. यमराज म्हणाले की हे नियमांच्या विरुद्ध आहे, पण सावित्रीच्या शहाणपणाने, प्रेमाने आणि तिच्या हट्टामुळे ते प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी तिला तीन वर मागायला सांगितले. सावित्रीने पहिल्या वरामध्ये तिच्या सासऱ्यांचं हरवलेलं राज्य मागितलं, दुसऱ्या वरामध्ये सासू-सासऱ्यांच्या डोळ्यांची दृष्टी मागितली आणि तिसऱ्या वरामध्ये स्वतःसाठी संतानप्राप्ती मागितली.
यमराजांनी सुरुवातीला काहीही विचार न करता सावित्रीला तिने मागितलेले तीन वर दिले. पण जेव्हा तिने शंभर मुलांची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसेल, तर हे शक्यच नाही. त्यांना समजले की सावित्रीचे प्रेम खोल आहे आणि निर्धार मजबूत आहे. तिच्या समर्पणाने आणि शुद्ध भावनेने यमराजही भारावून गेले. त्यांनी तिच्या प्रेमाची कदर केली आणि सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले.
या प्रकारे सावित्रीच्या प्रेमाने आणि तपामुळे सत्यवानाचा मृत्यू टळला. तेव्हापासून महिलांनी सावित्रीप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्री उपवास सुरू केला आणि वटवृक्षाची पूजा केली जाते, जो दीर्घायुष्य आणि अटळ प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.