

Shukra Gochar Diwali 2026 Astrology
Sakal
Diwali 2026 Astrology : दिवाळीचा सण आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचा काळ मानला जातो. यंदा दिवाळीच्या आसपास शुक्र ग्रहाच्या राशीपरिवर्तनामुळे ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्र हा धन, ऐश्वर्य, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या गोचराचा परिणाम आर्थिक स्थिती, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.